Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणवीर सिंहला अमेरिकन नंबरवरून मिळाली धमकी; १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता रणवीर सिंगला देखील धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. तसेच हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 20, 2026 | 02:31 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रणवीर सिंहला मिळाली धमकी
  • अमेरिकन नंबरवरून अभिनेत्याला लागला फोन
  • १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
 

‘धुरंधर’मधील भूमिकेमुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग सध्या एका गंभीर प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या मध्यस्थानी आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीकडून अभिनेत्याला १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सतर्कता वाढवली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हॅरी बॉक्सर नावाच्या व्यक्तीने रणवीर सिंगला व्हॉट्सॲपवर व्हॉइस नोट पाठवत १० कोटी रुपयांची मागणी केली. ही व्हॉइस नोट अमेरिकन क्रमांकावरून पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हा संदेश परदेशातून VPN चा वापर करून पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोपीने आपला खरा ठावठिकाणा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

या प्रकरणाचा तपास करताना मुंबई गुन्हे शाखेने संबंधित व्हॉइस नोटची तांत्रिक पडताळणी केली असून ती हॅरी बॉक्सरचीच असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अमेरिकन तपास यंत्रणांशी संपर्क साधला आहे. संबंधित नंबरचा स्त्रोत, त्याचा वापर कुठून झाला आणि त्यामागील नेटवर्क याचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

अभिनेता रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच रणवीर सिंगला धमकीचा हा संदेश मिळाल्याने या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

रणवीर सिंगने हा संदेश मिळताच तत्काळ मुंबई पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, त्याच्या घराबाहेर आणि निवासस्थानी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. तसेच क्राइम ब्रँचने रणवीर सिंगच्या मॅनेजरचा जबाबही नोंदवला आहे.

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह

या संपूर्ण प्रकरणात अद्याप औपचारिक एफआयआर दाखल झालेला नसला, तरी प्राथमिक चौकशी आणि तांत्रिक तपास वेगाने सुरू आहे. धमकीमागील खरे सूत्रधार कोण? त्यांचा उद्देश काय आणि त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी नेमका संबंध काय? याचा उलगडा करण्यासाठी पोलिस यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे चित्रपटसृष्टीतही खळबळ उडाली असून कलाकारांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदन दिले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: American number used to ranveer singh extortion threat voice note traced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम
1

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
2

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
3

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
4

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.