Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Welcome to the Jungle Box Office: विकेंडनंतरही दमदार कमाई कायम; पहिल्या सोमवारी 8 कोटींचा गल्ला

अक्षय कुमारच्या 'Welcome to the Jungle' ने पहिल्या सोमवारी 8 कोटी रुपयांची नेट कमाई करत बॉक्स ऑफिसवर दमदार पकड कायम ठेवली आहे. चार दिवसांत चित्रपटाने 71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून, पहिल्या आठवड्याअखेर 94 ते 95 कोटी रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 30, 2026 | 09:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अक्षय कुमारच्या ‘Welcome to the Jungle’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत घोडदौड कायम ठेवली आहे. पहिल्या सोमवारी चित्रपटाने अंदाजे 8 कोटी रुपयांची नेट कमाई करत उत्कृष्ट होल्ड दाखवला आहे. चार दिवसांत चित्रपटाच्या कमाईचा आकडा 71 कोटी रुपयांवर पोहोचला असून, पहिल्या आठवड्याअखेर हा आकडा 94 ते 95 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

गायकांसाठी सुवर्णसंधी! ‘Sa Re Ga Ma Pa Marathi’ च्या ऑडिशन्सला सुरुवात; जाणून घ्या नियम व शर्ती

ट्रेड रिपोर्टनुसार, पहिल्या सोमवारी ‘Welcome to the Jungle’ ची कमाई ‘Bhooth Bangla’ च्या तुलनेत सुमारे 25 ते 30 टक्के अधिक झाली. विकेंडमध्ये हा फरक जवळपास 13 टक्के होता. त्यामुळे सोमवारीही चित्रपटाने चांगली कामगिरी करत सकारात्मक ट्रेंड कायम राखल्याचे दिसून आले. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांचा त्याला काही प्रमाणात फायदा झाल्याचे मानले जात आहे.

दिल्ली-एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या भागांत चित्रपटाची कामगिरी सर्वाधिक मजबूत राहिली. या राज्यांमध्ये शुक्रवारीच्या तुलनेत कमाईत 35 ते 40 टक्के घट झाली, तर देशभरात ही घसरण सुमारे 48 टक्के होती. महाराष्ट्रात मात्र चित्रपटाच्या कमाईत 55 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. शुक्रवारी मिळालेल्या सुट्टीचा फायदा महाराष्ट्रात तुलनेने अधिक झाल्याचा परिणाम सोमवारी दिसून आल्याचे मानले जात आहे.

ट्रेड तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात प्रदर्शित होणारा ‘Alpha’ हा चित्रपट ‘Welcome to the Jungle’साठी फारसा अडथळा ठरणार नाही. मात्र, तिसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणारा ‘Dhamaal 4’ हा कॉमेडी चित्रपट त्याच प्रेक्षकवर्गाला आकर्षित करणार असल्याने त्यावेळी खरी स्पर्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यातील कामगिरीच चित्रपटाच्या अंतिम यशावर महत्त्वाचा प्रभाव टाकणार आहे.

चित्रपटाच्या दिवसनिहाय कमाईवर नजर टाकल्यास, प्रीव्ह्यू शोमधून 3.75 कोटी, शुक्रवारी 15.25 कोटी, शनिवारी 20 कोटी, रविवारी 24 कोटी आणि सोमवारी 8 कोटी रुपये अशी कमाई झाली आहे. अशाप्रकारे चार दिवसांत चित्रपटाने एकूण 71 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

Ab Hoga Hisab Season 2 चा ट्रेलर प्रदर्शित! प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद, अपेक्षेपेक्षाही लवकर दुसऱ्या सीझनसह परत

टीप : वरील बॉक्स ऑफिस आकडेवारी ही ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजांवर आधारित असून अधिकृत आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Welcome to the jungle box office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Akshay Kumar

संबंधित बातम्या

Welcome To The Jungle Box Office Collection: वेलकम टू द जंगल’ची जागतिक बॉक्स ऑफिसवर घोडदौड; कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
1

Welcome To The Jungle Box Office Collection: वेलकम टू द जंगल’ची जागतिक बॉक्स ऑफिसवर घोडदौड; कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
2

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं
3

Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.