फोटो सौजन्य - Social Media
या रिअॅलिटी शोच्या ऑडिशनला सुरुवात झाली असून, यासंदर्भातील पोस्ट स्वतः झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ऑडिशनसाठी इच्छुक गायकांनी 79771 24313 किंवा 90821 93561 या दोन व्हॉट्सअॅप क्रमांकांवर आपला ऑडिशन व्हिडिओ पाठवायचा आहे. १६ ते ३० वर्षे वयोगटातील गायकांनाच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ जुलै २०२६ आहे. झी मराठीने पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “महाराष्ट्र पाहतोय तुमच्या सुरेल आवाजाची वाट… चला, पटापट ऑडिशन देऊन या! ‘सा रे ग म प’ लवकरच… आपल्या झी मराठीवर!”
पोस्टमध्ये गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांना टॅग करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात ते पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
‘
सा रे ग म प मराठी’ हा झी मराठीवरील लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो असून मराठीतील अनेक गुणी गायकांना व्यासपीठ मिळवून देणारा महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात १८ सप्टेंबर २००६ रोजी झाली होती. आतापर्यंत या शोचे अनेक हंगाम तसेच **’सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’**चेही अनेक सीझन प्रसारित झाले आहेत. या मंचाने वैशाली माडे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांसारखे अनेक गुणी गायक मराठी संगीतसृष्टीला दिले आहेत.






