(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टबद्दल एक मोठी बातमी येत आहे. अभिनेत्रीच्या प्रोडक्शन कंपनी इटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या अकाउंटमधून पैसे उकळल्याचा आरोप आहे. हा आरोप वेदिका प्रकाश शेट्टी या महिलेवर करण्यात आला आहे, तिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. वेदिका प्रकाश शेट्टी ही अभिनेत्री आलिया भट्टची पर्सनल असिस्टंट होती. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच तिला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
राज निदिमोरू आणि सामंथा गळ्यातगळे घालून दिसले एकत्र, अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष
अभिनेत्रीने तक्रार दाखल केली होती
इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, आलिया भट्टच्या प्रोडक्शन हाऊस इटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या अकाउंट आणि वैयक्तिक अकाउंटमधून ७६ लाखांहून अधिक रुपये काढण्यात आले आहेत. या फसवणुकीच्या प्रकरणात वेदिका प्रकाश शेट्टीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की आलिया भट्ट आणि तिची आई सोनी राजदान यांनी काही महिन्यांपूर्वी जुहू पोलिस ठाण्यात वेदिकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. बेंगळुरूमध्ये तिचे लोकेशन ट्रक केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.
पोलीस कोठडीत पाठवले
अहवालात पुढे म्हटले आहे की वेदिका प्रकाश शेट्टीवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 316(4) आणि 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर अभिनेत्रीला न्यायालयात हजर करण्यात आले आणि तिला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. सध्या आलिया भट्ट किंवा तिच्या टीमने या प्रकरणात कोणतेही निवेदन दिलेले नाही.
‘Squid Game 3’ ने दोन आठवड्यातच रचला इतिहास, मोडले सगळे रेकॉर्ड; ‘या’ प्रसिद्ध यादीत मिळवले वर्चस्व
आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस प्रकरण
‘इटरनल सनशाइन प्रॉडक्शन्स’ची स्थापना आलिया भट्टने २०२१ मध्ये केली होती. आलियाच्या या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट ‘डार्लिंग्ज’ होता, जो शाहरुख खानच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत सह-निर्मित होता. या चित्रपटात आलिया भट्ट, विजय वर्मा आणि शेफाली शाह यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
वेदिका प्रकाश शेट्टी कोण आहे?
वेदिका शेट्टीने एकेकाळी आलिया भट्टसोबत काम केले होते आणि तिच्यावर अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची आणि प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता असे समोर येत आहे की तिने तिच्या पदाचा गैरवापर करून आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यांमधून पैसे काढले. या प्रकरणात आलिया आणि तिच्या टीमकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही आणि आता पोलिस या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत.