(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतातील दोन प्रसिद्ध पंजाबी गायक हनी सिंग आणि करण औजला अडचणीत सापडले आहेत. यो यो हनी सिंग आणि करण औजला यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. या दोन्ही कलाकारांच्या गाण्यांवर काही आरोप करण्यात आले आहेत आणि पंजाब राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून करण औजलाच्या ‘एमएफ गबरू’ या गाण्यावरून वाद सुरू आहे. आता हे गाणे त्याच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. तसेच याप्रकरणी गायक हनी सिंगचे देखील नाव सामील झाले आहे.
लोकप्रिय कोरियन अभिनेत्री Lee Min चे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन, राहत्या घरी आढळला मृतदेह
करण औजला आणि हनी सिंग यांच्यावर कारवाईची मागणी
पंजाब राज्य महिला आयोगाने आता हनी सिंग आणि करण औजला यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पंजाब राज्य महिला आयोगाने स्वतःहून याप्रकरणी दखल घेतली आहे. पंजाब राज्य महिला आयोगाने या प्रकरणात पंजाबच्या डीजीपींना पत्र लिहून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. इतकेच नाही तर आता हनी सिंग आणि करण औजला यांना ११ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजेच सोमवारी महिला आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. दोघांवरही त्यांच्या गाण्यांमध्ये महिलांविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे.
महिलांविरुद्ध अश्लील भाषेचा वापर केल्याचा केला आरोप
यो यो हनी सिंगच्या ‘मिलियनेअर’ या गाण्यावर आणि करण औजलाच्या ‘एमएफ गबरू’ या गाण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. दोघांवरही त्यांच्या गाण्यांमध्ये महिलांविरुद्ध अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे. करण औजलाच्या ‘एमएफ गबरू’ या गाण्यावर गेल्या अनेक दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. गायकाच्या गाण्याला पंजाबच्या संस्कृतीविरुद्ध म्हणत विरोध केला जात आहे. करण औजलाच्या ‘एमएफ गबरू’ या गाण्याला ६ दिवसांत युट्यूबवर ३४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
Bigg Boss 19 मध्ये नवा ट्विस्ट! Democrazy ने भरलेला असेल नवा सिझन, पहा Promo
‘मिलियनेअर’ गाण्यावर आक्षेप
दुसरीकडे, हनी सिंगचे ज्या गाण्यावर आक्षेप घेतला जात आहे ते गाणे ११ महिन्यांपूर्वी युट्यूबवर रिलीज झाले होते. हनी सिंगच्या ‘मिलियनेअर’ या गाण्याला ३९६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे खूप लोकप्रिय आहे. हनी सिंग त्याच्या एका गाण्यामुळे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. हनी सिंगचा वादाशी दीर्घकाळ संबंध आहे. तसेच हनी सिंगचे पुनरागमन झाल्यापासून गायकाचे सगळीच गाणी सुपरहिट होत आहे.