(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कोरियन मनोरंजन उद्योगातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘अॅज वन’ फेमची प्रसिद्ध अभिनेत्री ली मिन यांचे निधन झाले आहे. मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी लिन यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री ४६ वर्षांच्या होत्या. राहत्या घरी अभिनेत्रीचा मृतदेह आढळला आहे. सध्या पोलिस यासगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहे. ली मिन यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांच्या मीडिया एजन्सीने केली आहे.
आधी पायाला केला स्पर्श अन् घेतला आशीर्वाद, नंतर आदराने…; रणवीरचा वृद्ध महिलेसोबतचा खास Video पाहाच!
एजन्सीने जारी केलेले निवेदन
ली यांच्या मृत्यूची पुष्टी करताना, त्यांच्या मीडिया एजन्सीने म्हटले आहे की पोलिस अधिकारी चौकशी करत आहेत. परिस्थिती समजून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लोकांना कोणत्याही प्रकारचे अनुमान न लावण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘पोलीस सध्या नेमक्या परिस्थितीचा तपास करत आहेत. एजन्सी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत आहे’.
Lee Min, a South Korean singer and a member of the female R&B duo As One, has passed away. She was 46.
READ: https://t.co/vy8Y5eJnOd pic.twitter.com/ITBjHttelb
— PhilSTAR L!fe (@philstarlife) August 6, 2025
चाहत्यांना मिळाला धक्का
ली मिन यांच्या अचानक निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. ली मिन त्यांच्या संगीतावर काम करत होत्या. त्यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या बँड पार्टनर क्रिस्टलसोबत ‘स्टिल माय बेबी’ नावाचे एकल गाणे रिलीज केले आणि त्यानंतर जूनमध्ये ‘हॅपी बर्थडे’ हे गाणे रिलीज केले. १९७८ मध्ये जन्मलेल्या ली मिन कोरियन-अमेरिकन कलाकार होत्या. १९९९ मध्ये ‘एज वन’ या नावाने त्यांचा पहिला अल्बम ‘डे बाय डे’ रिलीज करून त्यांनी पदार्पण केले.
सलमान खान आणि अरबाजच्या बहिणींसाठी मलायका अरोराने ठेवली पार्टी, एकत्र दिसल्या ‘खान’ कुटुंबातील महिला
अभिनेत्रीच्या मैत्रिणीने व्यक्त केले दुःख
कोरियाबूच्या मते, एका जवळच्या मैत्रिणीने ली मिनच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आणि म्हटले, ‘असे घडले आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, कारण तिला इतक्या दिवसांनी प्रमोशन करण्यात खूप मजा येत होती. ती एक खूप सकारात्मक मैत्रीण होती’. अभिनेत्रीच्या मैत्रिणीने ही पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले आहे. तसेच आता चाहते देखील दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहत आहेत. ली मिनने अनेक टीव्ही शोमध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका देखील केली आणि काही चित्रपटांमध्ये काम केले.