Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YRF First Horror Movie: यश राज फिल्म्स घेऊन येणार भयाचा नवा खेळ! वरुण धवन बनणार हॉरर हिरो, रिलीज डेटही ठरली

YRF First Horror Movie: यश राज फिल्म्स (YRF) पहिल्यांदाच थिएट्रिकल हॉरर चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार असून, दिग्दर्शनाची जबाबदारी अभय पन्नू यांच्याकडे आहे. या चित्रपटाची पटकथाही अभय पन्नू यांनीच लिहिली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 14, 2026 | 12:40 PM
YRF First Horror Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

YRF First Horror Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • YRF पहिल्यांदाच हॉरर चित्रपटाची निर्मिती करणार.
  • वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार.
  • चित्रपट 31 मार्च 2028 रोजी जगभरात प्रदर्शित होणार.

     

यश राज फिल्म्सने आपल्या पहिल्यावहिल्या हॉरर चित्रपटाच्या जागतिक थिएट्रिकल प्रदर्शनासाठी 31 मार्च 2028 ही तारीख निश्चित केली आहे. वाईआरएफ म्हणजेच यश राज फिल्म्स पहिल्यांदाच हॉरर सिनेमा घेऊन येतंय. आणि त्याची तारीख पण ठरलीय. 31 मार्च 2028. या दिवशी हा सिनेमा जगभरात थिएटरमध्ये लागणार आहे. या सिनेमात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार असून आणि अभय पन्नू दिग्दर्शन करणार आहे. YRF First Horror Movie:

अद्याप या सिनेमाचं नाव ठरलेलं नाही. टायटल काय असेल, हे अजून सांगितलेलं नाही. पण हा सिनेमा मोठ्या पडद्यावर एकदम नवा आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हॉरर अनुभव देणार आहे, असं सांगितलं जातंय.

तर थेट भूताचा सिनेमा

यामध्ये वाईआरएफचा खास भव्य आवाका, दर्जेदार निर्मिती आणि सिनेमॅटिक महत्त्वाकांक्षा पाहायला मिळणार आहे.वाईआरएफचे सिनेमे कसे असतात, हे सगळ्यांना माहितीये. मोठा सेट, मोठं बजेट, भारी निर्मिती. या हॉरर सिनेमात पण तेच पाहायला मिळणार आहे. फक्त यावेळी प्रेम कथा नाही, ॲक्शन नाही, तर थेट भूताचा सिनेमा आहे.

या प्रोजेक्टच्या माध्यमातून यश राज फिल्म्स अधिकृतपणे थिएट्रिकल हॉरर या प्रकारात पदार्पण करत आहे.आतापर्यंत वाईआरएफने रोमँटिक, ॲक्शन, ड्रामा, कॉमेडी आणि थ्रिलर अशा सगळ्या प्रकारचे सिनेमे बनवलेत. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून ते पठाण, वॉर पर्यंत. पण हॉरर सिनेमा कधीच बनवला नव्हता. आता पहिल्यांदाच ते हॉररमध्ये उतरतायत. त्यामुळे वाईआरएफच्या सिनेमांच्या यादीत एका नव्या प्रकाराची भर पडणार आहे.

हा चित्रपट आदित्य चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केला जात आहे, तर वाईआरएफचे सीईओ अक्षय विधानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. आदित्य चोप्रा स्वतः या सिनेमावर लक्ष ठेवून घेतलं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा सिनेमा तयार केला जात आणि तसेच सिनेमाचे प्रोड्युसर अक्षय विधानी आहेत.

Miranda Warning Trailer Released: मराठी सिनेसृष्टीत रहस्याचा थरार! ‘मिरांडा वॉर्निंग’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक कोण?

‘रॉकेट बॉईज’ या मालिकेसाठी विशेष ओळखले जाणारे आणि प्रशंसित कथाकार अभय पन्नू या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, त्यांनीच या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे.

दिग्दर्शक आहे अभय पन्नू. त्याला लोक ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरिजमुळे ओळखतात. ती सीरिज खूप गाजली होती. त्याने ती सीरिज खूप छान बनवली होती. आता तोच या हॉरर सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. आणि विशेष म्हणजे कथा पण त्यानेच लिहिलीय. पटकथा पण त्याचीच आहे. थिएट्रिकल फीचर फिल्म दिग्दर्शक म्हणून हा अभय पन्नू यांचा पहिलाच चित्रपट असेल.

वाईआरएफ नेहमी नवीन लोकांना संधी

मोठ्या पडद्यासाठी सिनेमा दिग्दर्शित करणं, ही त्याची पहिलीच वेळ आहे. आधी त्याने सीरिज केली होती, आता थेट थिएटरमध्ये लागणारा सिनेमा. त्यामुळे त्याच्यावर पण मोठी जबाबदारी आहे.भारतीय सिनेमातील नव्या आणि वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या वाईआरएफच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं हे आणखी एक उदाहरण आहे. वाईआरएफ नेहमी नवीन लोकांना संधी देतं. नवीन दिग्दर्शक, नवीन लेखक यांना ते नेहमी पुढे आणतात. अभय पन्नूला संधी देणं, हे त्याचंच एक उदाहरण आहे.

वरुण धवन दुसऱ्यांदा YRF सोबतया चित्रपटाच्या निमित्ताने वरुण धवन यश राज फिल्म्ससोबत दुसऱ्यांदा काम करणार आहेत. वरुण धवन याआधी पण वाईआरएफसोबत काम केलंय. आता हा दुसरा सिनेमा आहे. या प्रोजेक्टमधून अभिनेता एका पूर्णपणे नव्या सिनेमॅटिक विश्वात प्रेक्षकांसमोर येणार आहे.वरुणला आपण आतापर्यंत कॉमेडी, रोमँटिक, ॲक्शन सिनेमात बघितलंय. पण हॉररमध्ये तो कसा दिसेल, हे बघायला सगळ्यांना उत्सुकता आहे. तो या सिनेमात एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे, असं सांगितलं जातंय.

Jay Jay Swami Samarth : मंदिरात प्रवेश नाकारला, पण स्वामींचं दिव्य दर्शन घडलं! शंकर-रुहीला अलौकिक अनुभूती

आता 2028 खूप लांब आहे, हे खरंय. अजून 1 वर्षापेक्षा जास्त वेळ आहे. पण वाईआरएफने आत्ताच तारीख जाहीर केलीय. म्हणजे त्यांनी प्लॅनिंग पक्कं केलंय. सिनेमाचं नाव काय असेल, वरुण सोबत हिरोईन कोण असेल, कथा काय असेल, हे सगळं हळूहळू समोर येईल.पण एक गोष्ट नक्की, वाईआरएफचा पहिला हॉरर सिनेमा आणि त्यात वरुण धवन, हे कॉम्बिनेशन लोकांना नक्की आवडणार आहे. 31 मार्च 2028 ला थिएटरमध्ये काय भयंकर घडणार आहे, हे बघायला थोडी वाट बघावी लागेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: YRF चा पहिला हॉरर चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

    Ans: हा चित्रपट 31 मार्च 2028 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • Que: YRF च्या पहिल्या हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार आहे?

    Ans: अभिनेता वरुण धवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • Que: YRF च्या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार आहे?

    Ans: अभय पन्नू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Web Title: Yrf first horror movie varun dhawan abhay pannu release date 2028 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 12:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.