Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आणखी एक बालनाट्य रंगभूमीवर, ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत

‘अंजू उडाली भुर्र’ या बालनाट्याचा तालमीचा मुहूर्त नुकताच झाला. अशोक पावसकर आणि चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 18, 2025 | 11:46 AM
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आणखी एक बालनाट्य रंगभूमीवर, ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आणखी एक बालनाट्य रंगभूमीवर, ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत

Follow Us
Close
Follow Us:

‘अंजू उडाली भुर्र’ या बालनाट्याचा तालमीचा मुहूर्त नुकताच झाला. अशोक पावसकर आणि चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले. नावारूपाला आले. पावसकर दांपत्य डॉक्टर सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या साथीने ‘अंजू उडाली भुर्र’ हे एक भव्य बाल नाट्य प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवर्य नरेंद्र बल्लाळ लिखित हे नाटक ५५ वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालं होतं.त्या वेळी आताच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे ह्यांनी अंजूची भूमिका केली होती. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिगंबर राणे आणि स्वतः पावसकर दांपत्य ह्या नाटकात अभिनय करत असत.

Ashi Hi Jamva Jamvi: वयाचं बंधन कशालाच नसतं, ना मैत्रीला, ना प्रेमाला, ना विनोदाला; ‘अशी ही जमवाजमवी’चा धमाल कॉमेडी टीझर रिलीझ…

प्रेरणा थिएटर्स निर्मित ‘अंजू उडाली भुर्र’ हे नाटक १९ एप्रिल रोजी रंगमंचावर येणार आहे गुरुवारी नरेंद्र बल्लाळ ह्यांची जयंती आणि ठाणे वैभव ह्या वर्तमानपत्राचा सुवर्णमहोत्सव हा योग साधून १९ एप्रिल रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे याचा पहिला प्रयोग होणार आहे, त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे बालनाट्य रसिकांचे मनोरंजन करत फिरणार आहे. आता ह्या नाटकाचे पुनर्लेखन, गीत लेखन आणि दिग्दर्शन कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक, ती फुलराणी, हिमालयाची सावली, करून गेलो गाव आणि इतर अनेक नाटकांचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे करणार आहेत.

 

नेपथ्य ‘अलबत्या गलबत्या’या गाजत असलेल्या नाटकाचे आणि इतर अनेक नाटकांचे नेपथ्य करणारे संदेश बेंद्रे करत आहेत. प्रकाश योजना सुप्रसिद्ध प्रकाशयोजनकार श्याम चव्हाण तर संगीत हवा येऊ दे मध्ये आपल्या संगीताने विनोदी पंचेसना फुलवणारे तुषार देवल ह्यांचं आहे. रंगभूषा उदयराज तांगडी आणि वेशभूषा श्रद्धा माळवदे आणि पूजा देशमुख करत आहेत. ध्वनी संयोजन सुनील नार्वेकर करणार आहेत.जाहिरात संकल्पना आणि डिझाइन अक्षर शेडगे ह्यांचे आहे. जाहिरात प्रसिद्धी बी.वाय.पाध्ये पब्लिसिटी ही अनेक वर्षांपासूनची विश्वासार्ह जाहिरात एजन्सी करत असून नाटकाचे सूत्रधार नितीन नाईक आहेत.

१३ वर्षे मोठ्या असलेल्या नसीरुद्दीन शाहवर रत्ना पाठक यांचं कसं जडलं प्रेम; वाचा भन्नाट लव्हस्टोरी

या बालनाट्यात ९ हरहुन्नरी कलाकार असून त्यात ‘हवा येऊ दे फेम’ अंकुर वाढवे, ‘यदाकदाचित’ मधील धमाल गांधारी पूर्णिमा अहिरे, सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतून तयार झालेले गुलाब लाड, चिंतन लांबे, विजय मिरगे, प्राची रिंगे, गौरवी भोसले, प्राधीर काजरोळकर , बाबली मयेकर आणि अंजूच्या भूमिकेत नवोदित बाल अभिनेत्री स्कंदा गांधी दिसणार आहेत. संगीत नृत्य आणि चमत्कारपूर्ण नेपथ्य प्रकाश योजनेने सजलेले हे बालनाट्य फक्त बाल प्रेक्षकांच्याच नाही तर त्यांच्या पालकांच्या आणि नातेवाईकांच्या पण पसंतीस उतरेल असा विश्वास या सगळ्या चमूला आहे.

Web Title: Chala hawa yeu dya actor ankur wadhave to play role on anju udali bhurr balnatya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • Television Shows

संबंधित बातम्या

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
1

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा
2

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…
3

“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन
4

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.