दहाव्या दिवशीही 'छावा'चाच बोलबाला! कमाईत पार केला 300 कोटींचा टप्पा; एकूण कलेक्शन किती?
Chhaava Box Office Collection Day 10 : विकी कौशल अभिनित ‘छावा’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाल्यापासून ‘छावा’चित्रपटाचे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हाऊसफुल शो आहेत. यामुळेच फक्त दहा दिवसांत चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘छावा’मुळे विकी कौशलच्या फिल्मी करिअरला देखील नवीन कलाटणी मिळाली आहे. विकीची मुख्य भूमिका असलेल्या ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. जाणून घेऊया, चित्रपटाच्या १० दिवसांच्या कमाईबद्दल…
‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग !
मराठा सम्राज्याचे वीर योद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, डायलॉग्ससह चित्रपटासंबंधित असलेल्या इतरत्र गोष्टींची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या सध्याच्या कमाईचा वेग पाहता निर्मात्यांसह दिग्दर्शक आणि कलाकारही अचंबित झाले आहे. पहिल्या आठवड्यामध्ये २२५. २८ कोटी, आठव्या दिवशी २४.०३ कोटी, नवव्या दिवशी ४४.०१ कोटी तर दहाव्या दिवशी ४१.१ कोटींची कमाई केली आहे. दहाव्या दिवशीही चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत असून चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत.
मॅडॉक फिल्म्सच्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर करण्यात आलेल्या कमाईच्या आकड्यावरून चित्रपटाने बरेच रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. खरंतर, विकी कौशलच्या ह्या चित्रपटाने फार कमी काळात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. या यादीत पुष्पा २, जवान, पठान, ॲनिमल, गदर २ स्त्री २, बाहुबली २ सह आदी चित्रपटांचा समावेश आहे. विकी कौशलने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये ‘छावा’हा चित्रपट सर्वांत मोठा ठरला आहे. दरम्यान, चित्रपटाने जगभरातील कमाईमध्ये ४०० कोटींचा टप्पा गाठला आहे. जर चित्रपटाच्या कमाईचा वेग असाच कायम राहिला तर, जगभरातच नाही तर देशभरातही ५०० कोटींचा टप्पा पार करेल. इतिहासावर आधारित मराठी कथा हिंदी चित्रपटांत मांडली गेली आणि देशभरात सुपरहिट ठरली, याचा सर्वांना अभिमान वाटत आहे.
संभाजी महाराजांचा पराक्रम आणि बलिदान संपूर्ण देशाला माहिती व्हावे, यासाठी ‘छावा’ एक महत्त्वाचा चित्रपट ठरत आहे. १३० कोटींचा बजेट असलेल्या ‘छावा’चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. संतोष जुवेकरने रायाजी हे पात्र साकारले आहे, तर विनित सिंह कवी कलश या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, आशुतोष राणा, सारंग साठ्ये, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी हे कलाकारही या चित्रपटात आहेत.