Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colours Marathi Serial:‘बाईपण जिंदाबाद’ नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ सात लोकप्रिय अभिनेत्री एकत्र दिसणार

कलर्स मराठीवर लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दिग्गज अभिनेंत्रीची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2025 | 01:30 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या आणि समाजाचं वास्तव दाखवणाऱ्या कथा सादर करत आलं आहे. आता घेऊन येत आहे एक सशक्त अँथॉलॉजी मालिका. ‘बाईपण जिंदाबाद’, जी स्त्रीच्या असंख्य रूपांना, तिच्या त्यागाला, संघर्षाला आणि सामर्थ्याला सलाम करणार आहे. ती आई आहे जी मुलांच्या आनंदात स्वतःचं आयुष्य शोधते, ती पत्नी आहे जी पतीच्या प्रत्येक संकटात खंबीर उभी राहते, ती सून आहे जी नव्या घरात रुजते, आणि ती मुलगी आहे जी आईवडिलांचं जग उजळवते. ती प्रेम, त्याग, सहनशीलता आणि सामर्थ्याचं मूर्त रूप आहे… पण या सगळ्याच्या पलीकडे ती स्वतः आहे: विचारशील, संवेदनशील आणि ठाम. तिच्या आयुष्यातील तुटलेल्या स्वप्नांपासून नव्याने उभं राहण्यापर्यंतचा प्रवास ही मालिका दाखवेल. कारण ती फक्त घर नाही सांभाळत, ती संपूर्ण जग सांभाळते. तिच्या या सामर्थ्याचा, तिच्या बाईपणाचा उत्सव म्हणजेच ‘बाईपण जिंदाबाद!’ २६ ऑक्टोबरपासून, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर!

दिवाळी २०२५: घरबसल्या कुटुंबासोबत पाहा ५ धमाल बॉलिवूड चित्रपट!

या मालिकेत आपल्या आवडत्या मराठी अभिनेत्री सुकन्या मोने, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, क्रांती रेडकर, शलाका पवार, दीपा परब, उर्मिला कोठारे, आणि प्रार्थना बेहेरे झळकणार आहेत. या सर्वजणी एका समान सूत्राने जोडल्या गेल्या आहेत – ‘स्त्रीत्वाचा उत्सव’. प्रत्येक अभिनेत्री आपल्या व्यक्तिरेखेतून वेगवेगळ्या भावनांना आकार देते. कधी संघर्षाची कहाणी सांगते, कधी सोडून देण्याचं धैर्य दाखवते, तर कधी जगण्याचा नवा अर्थ शोधते. ही मालिका प्रत्येक मराठी स्त्रीला स्वतःचा आरसा दाखवणारा प्रयत्न आहे. आईपणाचं उबदारपण, पत्नीपणाचं ओझं आणि ‘स्वतः’ असण्याची धडपड या मालिकेच्या प्रत्येक भागात जिवंत होते. मालिकेची पहिली कथा ‘असिस्टंट माझी लाडकी’ ही स्वप्नाळू माधवी (सुकन्या कुलकर्णी मोने) हिची आहे जी एका वर्कहोलिक बॉसखाली (प्रार्थना बेहेरे) असिस्टंट म्हणून काम करते. वर्कहोलिक बॉस आणि तिची नवी असिस्टंट एकमेकांना तोडीस तोड ठरणार की त्यांच्यात एक छान मैत्रीचं नातं निर्माण होणार? दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांचा हा अनोखा दृष्टिकोन अनुभवायला विसरू नका ‘असिस्टंट माझी लाडकी’ या भागात.

Colours Marathi : ‘आई तुळजाभवानी’मध्ये उलगडणार षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष!

‘बाईपण जिंदाबाद’च्या प्रत्येक कथेतून स्त्रीचं अंतर्मन, तिचं धैर्य, आत्मसन्मान आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास दिसतो. समाजाच्या चौकटीत न अडकता ती स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा हक्क मिळवते. तिचं बाईपण म्हणजे फक्त नात्यांचं ओझं नव्हे, तर प्रेम, जीवनसृजन आणि आत्मभानाचं प्रतीक आहे. ही मालिका स्त्रीच्या अश्रूंमागचं सामर्थ्य, शांततेतील आवाज आणि हसण्यातली जिद्द दाखवणारी हृदयस्पर्शी सफर आहे. कलर्स मराठीची ही नवी मालिका सांगते “ती फक्त जगत नाही, ती जीवन घडवते..

Web Title: Colors marathi new show baipan zindabad including alka kubal to nivedita saraf seven popular actresses will be seen together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • colors tv
  • Colours Marathi
  • marathi serial news

संबंधित बातम्या

‘इंद्रायणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात? इंद्रायणीच्या वाढणार अडचणी
1

‘इंद्रायणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात? इंद्रायणीच्या वाढणार अडचणी

थाटात पार पडला प्राजक्ता – शंभूराजचा संगीत कार्यक्रम! कपलने एकत्र केला डान्स; पाहा PHOTOS
2

थाटात पार पडला प्राजक्ता – शंभूराजचा संगीत कार्यक्रम! कपलने एकत्र केला डान्स; पाहा PHOTOS

देवमाणूस- मधला अध्यायमध्ये नवा ट्विस्ट,  साकेतचा खून, शामल साक्षीदार; लालीच्या जाळ्यात अडकणार का अजित?
3

देवमाणूस- मधला अध्यायमध्ये नवा ट्विस्ट, साकेतचा खून, शामल साक्षीदार; लालीच्या जाळ्यात अडकणार का अजित?

Colors Marathi: दत्तजयंती विशेष सप्ताह,  ‘जय जय स्वामी समर्थ’ मध्ये स्वामींचं दैवी त्रिदेव रूप दर्शन
4

Colors Marathi: दत्तजयंती विशेष सप्ताह, ‘जय जय स्वामी समर्थ’ मध्ये स्वामींचं दैवी त्रिदेव रूप दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.