Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्रीची रंगत न्यारी, जगात भारी यांची यारी; प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी ‘पिंगा गं पोरी पिंगा’

रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट मैत्रीचं नातं असतं. पाच भिन्न स्वभावाच्या मैत्रीणींची भन्नाट गोष्ट 'पिंगा ग पोरी पिंगा' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 19, 2024 | 04:37 PM
मैत्रीची रंगत न्यारी, जगात भारी यांची यारी; प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी 'पिंगा गं पोरी पिंगा'

मैत्रीची रंगत न्यारी, जगात भारी यांची यारी; प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी 'पिंगा गं पोरी पिंगा'

Follow Us
Close
Follow Us:

रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट मैत्रीचं नातं असतं. याच मैत्रीच्या नात्यावर आधारित आजवर अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर पाच भिन्न स्वभावाच्या मैत्रीणींची भन्नाट गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.’पिंगा ग पोरी पिंगा’ या नव्या मालिकेत पाच मैत्रीणींची, त्यांच्या स्वप्नांची अनोखी दुनिया प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या शेटे, विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

हे देखील वाचा- महाराष्ट्राच्या मामांच्या नव्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली; महानायक अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर

वैभव चिंचाळकर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. तेव्हा नक्की बघा प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी नवी गोष्ट ‘पिंगा गं पोरी पिंगा’, 25 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या महिलांची ज्यांच्या मनात भविष्याची स्वप्न आहेत. स्वत: काहीतरी करुन दाखवायची जिद्द आहे आणि त्यासाठी घरापासून दूर बाहेरच्या जगात स्वत:चं अस्तित्व उभं करण्याची त्यांची धडपड सतत सुरू असते. या धडपडीत जेव्हा आपल्या सारख्याच अनेक सख्या त्यांना सापडतात तेव्हा त्या मैत्रीची रंगत जगावेगळी असते.

 

पुरुषांच्या मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट, नाटक, वेब सीरिजची निर्मिती झाली आहे. पण बायकांची मैत्री त्यापेक्षा खूप वेगळी असते आणि हीच मैत्री प्रेक्षकांना ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये अनुभवता येईल. वकील होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या नवऱ्याच्या मदतीने मुंबईत आलेली जळगावची वल्लरी जेव्हा इथे अनेक वर्ष राहून स्ट्रगल करणाऱ्या मिठू (सातारा), तेजा (पुणे), श्वेता (सोलापूर) आणि प्रेरणा (कोकण) यांच्यासोबत पेइंग गेस्ट म्हणून राहू लागते. तेव्हा या शहरात रंगलेल्या मुलींवर वल्लरीसोबत आलेला गावचा रंग चढू लागतो. सुरुवातीला वल्लरीला घरातून काढण्यासाठी टपलेल्या या मुली हळू हळू तिच्या खास मैत्रिणी कशा बनतात याचा हा रंजक प्रवास आहे.

हे देखील वाचा- सुष्मिता सेनने तिच्या दोन्ही लेकींना शिकवला आदर मिळवण्याचा योग्य मार्ग, तुमच्याही मुली ठरतील खास द्या ‘अशी’ शिकवण

‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत प्रेक्षकांना मैत्रीचे अनेक रंग पाहायला मिळतील. पण त्या सोबतच स्त्रियांच्या भावविश्वाचे विविध पैलू अतिशय मनोरंजक पद्धतीने आपल्याला पहायला मिळतील. प्रेम, लग्न, करियर, पालकांसोबत असलेलं त्यांचं नातं, शहरात एकट्या राहणाऱ्या मुलींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, रोजच्या आयुष्यात त्यांना येणाऱ्या अडचणी आणि या सगळ्या अडचणीवर मात करत एकमेकांच्या मदतीने ठामपणे उभ्या राहणाऱ्या या पाच महिलांची गोष्ट म्हणजेच ‘पिंगा गं पोरी पिंगा’. प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी ही मालिका आहे.

कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे मालिकेबद्दल म्हणाले,”प्रेक्षकांची आवड लक्षात घेत नवनवे कार्यक्रम देण्याचा आमचा उद्देश आहे. रिफ्रेशिंग, कलरफुल गोष्ट प्रेक्षकांना ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत पाहायला मिळेल. स्वत:चं अस्तित्व शोधणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही गोष्ट आहे. नेहमीच्या मालिकांपेक्षा ही मालिका नक्कीच वेगळी आहे. पाच मैत्रीणींच्या मैत्रीची रंगत पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल”.

Web Title: Colors marathi serial pinga ga pori pinga telecast coming soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 04:37 PM

Topics:  

  • colors marathi

संबंधित बातम्या

बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकणार, असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार…
1

बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकणार, असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार…

‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकांचा होणार महासंगम, गुढीपाडवा विशेष रंगणार दोन तासाचा भाग
2

‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकांचा होणार महासंगम, गुढीपाडवा विशेष रंगणार दोन तासाचा भाग

मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?
3

मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?

‘वल्लरी’ आणि ‘पिंगा गर्ल्स’ना ‘अशोक मा.मा.’ देणार मदतीचा हात, मालिकेला मिळणार वेगळं वळण
4

‘वल्लरी’ आणि ‘पिंगा गर्ल्स’ना ‘अशोक मा.मा.’ देणार मदतीचा हात, मालिकेला मिळणार वेगळं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.