
Exclusive: कलर्स मराठीवरील 'मोहिनी'ची पहिली दिवाळी, खास अनुभव केला शेअर
Exclusive: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, फराळ आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण! यंदाची दिवाळी आणखी खास करण्यासाठी कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिकेतील लोकप्रिय कलाकार समीर परांजपे आणि अनघा ठाकूर यांनी आपल्या चाहत्यांसाठी त्यांच्या दिवाळीच्या आठवणी, आवडीनिवडी, सेटवरची धमाल आणि मालिकेतील खास गोष्टी सांगितल्या आहेत. याबाबत ‘नवराष्ट्र’सह केलेली खास बातचीत.
मालिकेतील तुमच्या व्यक्तिरेखेसाठी दिवाळी सण किती खास आहे? यावर नेहमीच्या अंदाजाने समीरने सांगितलं की, ‘आरकेसाठी दिवाळी डेफिनेटली खास असणार आहे यंदा. कारण मोहिनी घरात आलीये आणि मोहिनी घरात आल्यापासून आपण पाहिलंच आहे की खऱ्या अर्थाने सण साजरे होतात कारखानीस कुटुंबामध्ये.
आरके याआधी दिवाळी साजरी करत होताच, पण त्याच्यासाठी ती इव्हेंट असायची, खरं सांगायचं तर. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला सगळ्या गोष्टी दिलेल्या असायच्या, त्या त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी अरेंज केल्या जाणार आणि हे… पण आता मोहिनी घरात आल्यामुळे तिचा एक वेगळा अट्टाहास आहे की, सण साजरा करायचा आहे, सण उरकायचा नाहीये. त्यामुळे साजरा करायचा म्हटल्यानंतर मग त्यात तो रॉनेस पाहिजे, त्यात आपलं सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेशन हवं, असा एक तिचा अट्टाहास आहे, ज्याला आरके अजिबात रेडी नाहीये.
पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मोहिनी तिचं जे आहे ते साम, दाम, दंड, भेद… ते सगळं वापरून ते करून घेणार. त्यामुळे या वेळेला आता ती आरकेला कन्व्हिन्स करण्यासाठी काय करते, हे बघणं रंजक असणार आहे. त्यामुळे त्या अर्थाने आरकेसाठी दिवाळी खास असणार आहे यंदा.’
अनघाने सांगितलं की, ‘नक्कीच मोहिनीसाठी हा दिवाळी सण खास आहे, कारण तिची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. आतापर्यंत मोहिनी ने चाळीत आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली पण आता एका सुपरस्टार चा घरात दिवाळी साजरी करताना मोहिनी स्वतःचा टच देत आरके चा घरात काही गोष्टी करून घेतेय. जी वरवरची सजावट आणि सगळा कृत्रिम पणा आरके च्या घरात होता त्याला आपलेपणाची झालर लावण्याचा प्रयत्न मोहिनी करतेय आणि यासाठी ती सगळे राग-रुसवे, हेवेदावे, भांडणं विसरून सगळं प्रेमाने करतीये. तिचं म्हणणं आहे की सगळं कंत्राटदाराद्वारे करण्यापेक्षा “मलाच सगळं करायचं आहे, माझ्या सासरी मला फराळ बनवायचा आहे, मला रांगोळी काढायची आहे.” तर तिची ही सगळी धावपळ सुरू आहे आणि त्यात तिचा एक वेगळाच आनंद दडलाय.’
Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत
मालिकेतील कथानकात दिवाळीच्या निमित्ताने कोणते भावनिक किंवा रंजक वळण पाहायला मिळणार आहे? यावर अनघा म्हणाली की, ‘मला वाटतं दिवाळी विशेष भागांमध्ये तुम्हाला मालिकेमध्ये RK आणि मोहिनीचा दिवाळी पहाट चा पॉडकास्ट बघायला मिळणार आहे. जो थोडा हटके आणि खूप मनोरंजक असणार आहे, कारण त्यामध्ये तुम्हाला मोहिनी आणि RK या दोन्ही पात्रांच्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळणार आहेत. दिवाळीच्या पार्शवभूमीवर एकूण च केली जाणारी सगळी धम्माल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्या साठी सगळ्यांनी एपिसोड नक्की बघा… त्या सोबत च प्रतापराव ची टांगती तलवार आहेच. याचा समतोल राखत आरके आणि मोहिनी दिवाळी कशी साजरी करतात ते नक्कीच एक रंजक काहीतरी प्रेक्षकांना दिवाळीच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे.’
तर समीर परांजपेने सांगितलं की, ‘मालिकेत दिवाळीच्या निमित्ताने वळण म्हणाल तर डेफिनेटली आहेच की, एक तर प्रतापरावाला बाहेर काढायचंय जेलच्या. तर त्यासाठी जो एक संघर्ष उभा राहिलाय ऐन दिवाळीच्या तोंडावर आरके आणि मोहिनीमध्ये, तो संघर्ष कुठेतरी आता या दिवाळीच्या निमित्ताने शांत होणार का? का अजून वाढणार? म्हणजे थोडक्यात, फटाके फुटणार का ते शांत होणार? हा खरं तर आता ट्रॅक बघायला मिळू शकतो. हे एक रंजक वळण आहेच.
शिवाय भावनिक वळण म्हणाल तर एक आहे, पण ते मी आता तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला येत्या मालिकेच्या भागांमध्ये ते बघायला मिळेल. जे वळण खरं तर गणपतीच्या वेळेलाही आलेलं होतं, तेच कदाचित डोकं वर काढेल दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा. तर ते कुठलं हे तुम्हाला येत्या भागांमध्ये कळेलच. पण येस, त्या वेने हे एक रंजक वळण डेफिनेटली बघायला मिळेल.’
मालिकेच्या सेटवर दिवाळीचा माहोल कसा असतो? अनघा पटकन म्हणाली की, ‘मी पहिल्यांदाच अनुभवतीये, पण धमाल मजा येतीये की अख्ख घर, अख्ख आरके हाऊस आहे ते सजवलेलं आहे. म्हणजे गेल्या वेळेलाच असं फील होतंय की अरे, दिवाळी सुरू झालेली आहे. नवीन नवीन कपडे येत आहेत दिवाळीच्या एपिसोडसाठी घालायला. मोहिनी म्हणून मी फराळ बनवला, मी कंदील बनवला, सीनमध्ये हे सगळं केलं, रांगोळी काढली. तर मला वाटतं की माहोल एकदम सेट झालेला आहे.
किंवा आमची आता ‘कलर्स मराठी चॅनेल ‘ची दिवाळी पार्टी होती, त्याच्यामध्ये सगळी जवळची माणसं भेटली. तर नक्कीच एक माहोल तयार झालेला आहे दिवाळीचा. आम्ही फटाके सुद्धा फोडले, तर नक्कीच एक कमाल आणि आनंदी वातावरण आहे सगळ्यांमध्येच.’
समीरने मात्र सांगितलं की, ‘मालिकेच्या सेटवर दिवाळीचा माहौल कमालीचा असतो. कारण एक तर दिवाळीच्या आधी आम्ही दिवाळी साजरी करतो मालिकेमध्ये. आणि प्रकाशाचा सण आहे, पॉझिटिव्हिटी घेऊन येणार सण आहे, त्यामुळे सेटवर वेगळा माहौल असतो. पाच-सात दिवस तो सेटअप लागलेला असतो सगळा, आकाशकंदील, पणत्या आणि त्यामुळे एक डेफिनेटली वातावरण खूप सुंदर होतं. प्रत्येक फ्रेम सुंदर दिसते, वेगळी दिसते. आणि शिवाय वेगळं काहीतरी शूट करताना, आपले सण त्यानिमित्ताने आपल्याला टेलिव्हिजनवरही दाखवायला मिळतात प्रेक्षकांना, यातही गंमत आहे. त्यामुळे मालिकेच्या सेटवरचं वाईब कमाल असते.’
मालिकेतील तुमच्या व्यक्तिरेखेला दिवाळीच्या निमित्ताने एक इच्छा मागायची संधी मिळाली तर ती काय असेल? यावर समीर म्हणाला की, ‘विक्रीला दिवाळीच्या निमित्ताने काही मागायचं असेल तर मला असं वाटतं की तो हीच गोष्ट मागेल की त्याच्या आईवर जे संकट आलंय, ते दूर व्हावं आणि दूर व्हावं अशी प्रार्थना करत बसणाऱ्यातला तो नाहीये. प्रार्थना तर आहेतच पण शिवाय तो कुठल्याही थराला जाऊ शकतो त्याच्या आईसाठी, कारण आई ही एकमेव त्याच्या आयुष्यातली अशी व्यक्ती आहे जिच्यावर त्याने मनापासून आणि जिवापाड प्रेम केलंय. त्यामुळे आईला त्याच्या काही होऊ नये यासाठी तो डेफिनेटली मागेल असं मला वाटतं.
आणि समीर म्हणूनही मला याचं उत्तर द्यायला आवडेल की सध्या दुष्काळाची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि शेतकरी बांधव आपले थोडेसे संकटात आहेत किंवा यु नो, त्यांची दिवाळी यंदा तेवढी गोड नाहीये. पण या देशाचे नागरिक म्हणून आणि महाराष्ट्राचे पण नागरिक म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावाबहिणींसाठी म्हणून ही प्रार्थना आपण प्रत्येकाने केली पाहिजे की हा जो काही थोडासा अगोड प्रकार आयुष्यात आलाय त्यांच्या या दिवाळीमध्ये, अशी दिवाळी पुन्हा कधीही त्यांच्या आयुष्यात आणू नकोस.’
दरम्यान अनघाने उत्तर देताना एक मिनिटही वेळ घेतला नाही, ती म्हणाली, ‘मला वाटतं मोहिनीची एक माफक इच्छा असते की तिची जवळची माणसं म्हणजे तिची माहेरची, सासरची, तिचा नवरा या सगळ्यांनी नेहमी एकत्र राहावं, आनंदी राहावं. सगळे एकत्र असले कुठलाही संकट परतवून लावता येतं…
आणि आता सध्या प्रतापरावाचा ट्रॅक सुरू आहे की प्रतापरावाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी मोहिनीवर प्रेशर आणलं जातंय तर यापलीकडे मला वाटतं तिची एखादी इच्छा अशी असेल की सगळ्यांनी तिला समजून घ्यावं आणि प्रतापरावाला जेलमधून बाहेर काढू नये, हे तिचं म्हणणं सगळ्यांना पटावं. आणि RK ने हे ७ महिन्यांचं लग्न पर्मनन्ट करावं’
प्रेक्षकांना यंदाच्या दिवाळीत मोहिनीकडून कोणतं खास सरप्राईज मिळणार आहे? अनघा नेहमीप्रमाणे खास अंदाजात म्हणाली की, ‘खास सरप्राईज हेच असणार आहे की RK म्हणजे खडूस सुपरस्टार आहे आपला तो कसा बायकोच्या तालावर नाचतोय! म्हणजे मोहिनी कशी हुशारीने त्याच्याकडून सगळी कामं करून घेते, तर हे नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
कॅमेरा आहे, पॉडकास्ट सुरू आहे, कॅमेरासमोर आहे म्हणून आरके सगळी कामं करतोय, तिचं (मोहिनीचं) सगळं ऐकतोय आणि मोहिनीही तिच्या अंदाजाने सगळं करून घेतीये, तर हे सगळं पाहायला मिळणार आहे. नक्कीच हे सरप्राईज असणार आहे.’
तर समीर त्याच्या RK च्या अंदाजात म्हणाला की, ‘मोहिनी कडून खास सरप्राइज म्हणजे मी म्हटलं तसं की एक तर RK ला तुम्ही बऱ्याच ॲडव्हेंचरस गोष्टी करताना बघणार आहात, ॲडव्हेंचरस ॲज इन की ज्या गोष्टी त्यांनी कधी केल्याच नसतील, कधी त्याने स्वप्नातही कधी त्या स्वतःहून केल्या नसतील त्या सगळ्या करताना तुम्हाला RK दिसणार आहे. आणि हीच मला वाटतं हेच मोठं सरप्राइज असणार आहे या वेळेला. तो काय काय करतो किंवा काय काय करून घेते मोहिनी त्याच्याकडनं हे बघणंही इंटरेस्टिंग आहे आणि धमाल येणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढचे भाग मोहिनीचे अजिबात बघायला विसरू नका. तुमचं प्रेम तुम्ही कायम दाखवताच आहे, पण येणारे काही भाग फार इंटरेस्टिंग असणार आहेत एवढं नक्की.’
दोघांचाही आवडता दिवाळीचा पदार्थ कोणता? यावर अनघा म्हणाली की, ‘माझा सर्वात आवडता फराळातला पदार्थ आहे तिखट शंकरपाळी आणि चकली. मला या दोन गोष्टी खूप आवडतात, कोणत्याही वेळी मी कधीही खाऊ शकते.’ तर समीरने सांगितलं की, ‘आवडता पदार्थ कोणतीही शंका न आणता चकली. कारण म्हणजे त्याला तोडच नाही आहे. तो प्रकार असा आहे की जेव्हा तुम्ही तुमचं डायट आणि बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण विसरता की डीप फ्राईड खायला नको किंवा असं काही नसतं, चकलीला सगळं माफ आहे. म्हणजे बाकी सगळं डायट एकीकडे आणि चकली एकीकडे आणि मला वाटतं मोहिनीचं आवडता पदार्थ यंदा म्हणशील तर तो आरकेचं डोकं हे असेल. कारण सध्या तिचं तेच चाललंय मालिकेमध्ये.’
पहिला पाडवा आणि दिवाळी सण आहे मालिकेत, तर काय सांगशील? अनघा म्हणाली की, ‘पहिला पाडवा आहे, पण मोहिनी आणि आरकेचं नातं अजून तितकंसं खुललेलं नाहीये, म्हणजे प्रेमाच्या बाबतीत अजून ओपन झालेलं नाहीये. आणि सध्या प्रतापरावला जेलमधून बाहेर काढायचं की नाही यावरून वाद सुरू आहेत मोहिनी आणि आरकेमध्ये त्यामुळे पहिला पाडवा असं काही विशेष नाहीये. पण तुम्हाला जसं म्हणाले की पॉडकास्ट दाखवलं जाणार आहे, तर त्यामध्ये नक्कीच मोहिनी आणि आरकेची नोकझोक विथ रोमान्स बघायला मिळणार आहे.’ असं म्हणत तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
तर समीरनेही सांगितलं की, ‘येस, आरके आणि मोहिनीचा पहिला पाडवा आहे, पहिला दिवाळी सण आहे. खरं तर पाडवा साजरा करावा असं काय म्हणतो, तसं इक्वेशन अजून आरके आणि मोहिनीचं नाहीये मालिकेमध्ये. दोघही आपले टॉम अँड जेरीसारखे भांडतात एकमेकांशी अजूनही. पण मला असं वाटतं की तशाच पद्धतीचा काहीतरी पाडवा एक वेगळा आणि धमाल पाडवा तुम्हाला बघायला डेफिनेटली मिळू शकतो. आणि दिवाळी सणाच्या मनात तर येस हे डेफिनेटली आहे की मोहिनीचे आई-बाबा या सणासाठी डेफिनेटली एक्साइटेड असतील किंवा त्या काही गोष्टी तुम्हाला भागांमध्ये बघायला मिळतील येत्या.
पण दिवाळीच्या तोंडावर मी म्हटलं तसं थोडसं एक प्रतापराव नावाचं संकट उभं राहिलेलंच आहे, मग त्याला जेलमधून सोडवण्यासाठी मोहिनीला केस मागे घ्यावी लागेल किंवा काय? त्यामुळे दोघांमध्ये वादही झालेत, त्यामुळे आता हे वादाचे फटाके जास्त उडतायत, का ते तो वाद शमेल आणि दिवाळी गोड साजरी होईल, पहिला दिवाळी सण गोड साजरा होईल, हे आता येत्या भागांमध्ये तुम्हाला डेफिनेटली दिसेल. त्यामुळे कुठलाही भाग, एकही भाग दिवाळीचा मिस करू नका मोहिनीचा’ असं सांगत त्यानेही सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा दिल्या.