Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हल्ल्यानंतर सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा पहिला व्हिडीओ समोर, खंत व्यक्त करत केली ‘ही’ मागणी

२ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर आता प्रणित मोरेने पहिल्यांदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं हल्लेखोराबाबत खूप मोठी खंत व्यक्त केली असल्याचे पाहायला मिळतेय.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 09, 2025 | 04:03 PM
हल्ल्यानंतर सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा पहिला व्हिडीओ समोर, खंत व्यक्त करत केली 'ही' मागणी

हल्ल्यानंतर सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा पहिला व्हिडीओ समोर, खंत व्यक्त करत केली 'ही' मागणी

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. सोशल मीडियावर कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारा प्रणित गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रणितने गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये एका शोमध्ये ‘स्काय फोर्स’फेम वीर पहारियावर जोक मारला होता. त्याला हा जोक मारणं चांगलंच अंगलट आलं होतं. प्रणितचा कॉमेडी शो संपल्यानंतर त्याला १० ते १२ जणांनी मिळून मारहाण केल्याची माहिती त्याने स्वत: इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर आता प्रणितने आणखी एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले असून एक खंतही व्यक्त केली असल्याचे पाहायला मिळतंय.

“रांझा तेरा हीरिये…”; व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार आणखी एक नवीन रोमँटिक गाणं

प्रणित व्हिडीओ शेअर करत म्हणतो की, “सर्वांना नमस्कार. सुरुवातीला सगळ्यांना धन्यवाद. ज्या लोकांनी माझ्या तब्येतीविषयी विचारलं, माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना केली. बऱ्याच लोकांनी माझ्यावर झालेल्या हल्ल्याची स्टोरी शेअर केली. ज्यामुळे माझ्यावर झालेला हल्ला अधिक लोकांपर्यंत पोहोचले. आतापर्यंत या प्रकरणात सोलापूर पोलिसांनी पाच लोकांना अटक केली आहे. हे चांगलंच काम झालं आहे. पण, अजूनपर्यंत कोणाला अटक केलीये याची माहिती देण्यात आलेली नाही. जो मुख्य आरोपी आहे, तो अजूनही फरार आहे. ज्यांनी ही गोष्ट केलीये त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी आम्ही मागणी सतत करत आहोत. जेणेकरून पुढे भाषण स्वातंत्र्य करताना किंवा कोणताही व्यक्ती विनोद करत असेल तर त्याला जाऊन मारू शकतो, असा विचार केला नाही पाहिजे.”

 

“सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे सीसीटीव्ही फुटेज आहे, ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे आम्ही मागील सहा दिवसांपासून सतत पाठपुरावा घेत आहोत. जे काही बोललं जात आहे. हे खरंच घडलं होतं का? हे कोणी केलं? हे सर्वकाही स्पष्ट होईल. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे सर्वकाही दिसत आहे. याप्रकरणात कोण-कोण लोक होते? त्यामुळे समजलेच. त्या लोकांनी काय-काय केलं आहे? जशी माझी शेवटची पोस्ट सगळ्यांपर्यंत पोहोचली होती, तसाचा हा व्हिडीओ देखील पोहोचला जाईल. लवकरात लवकर कारवाई होईल आणि त्यामुळे समजले की, याप्रकरणात नेमका कोणाचा हात होता? हे सर्वांपर्यंत येईल.”असं प्रणित मोरे म्हणाला.

Chiki Chiki BooBoom Boom: ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी, चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

कॉमेडियन प्रणित मोरेवर २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता १० ते १२ जणांनी हल्ला करत मारहाण केली. यादरम्यान प्रणितला एकानं धमकावत, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मार के दिखा” असे म्हटलं. यामुळे वीर पहारीया यांच्यावर जोक केल्यानं ही मारहाण केलं असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, वीर पहारियाने प्रणित मोरे वरील हल्ल्याची दखल घेत सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचा यात काहीही संबंध नसल्याचे म्हटलं आणि या हल्ल्यात जो कोणी व्यक्ती जबाबदार असेल त्यावर कठोर कारवाई करण्यासही विनंती केली.

Web Title: Comedian pranit more first reaction after the assault in solapur video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 04:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.