दिपक कलालचा विमानात प्रवाश्यासोबत राडा, केली फ्लाईटमध्येच फुल ऑन हाणामारी; पाहा Video
कायमच आपल्या विचित्र व्हिडिओंमुळे चर्चेत राहणारा दिपक कलाल सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. दिपक कलालचा सध्या सोशल मीडियावर एक मारामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तुफान व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिपकने एका तरुणासोबत फ्लाईटमध्येच जबरदस्त हाणामारी केलेली आहे. दिपकने स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे.
चित्रपटगृहात २६ व्या दिवशी ‘सिंघम अगेन’ची वाईट अवस्था, लाखोंची कमाई घटली!
दिपक कलालने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो एका तरुणासोबत भांडताना दिसतोय. भांडणाचं कारण असं की, दिपक फ्लाईटमध्ये लगेज बॉक्समधून त्याचं सामान काढत असताना त्याचा धक्का बाजूला बसलेल्या तरुणाला लागतो. त्यामुळे त्या तरुणाने मला धक्का लागतोय प्लिज तुम्ही तुमच्या जागेवर शांत बसून घ्या, असं सांगतो. पण दिपक काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. उलट मी सेलिब्रिटी आहे, असं म्हणत तो अक्षरश: त्या मुलासोबत भांडू लागला. दरम्यान त्याने भांडणामध्ये आपल्या हातातल्या बॅगेनेच त्याच्यावर हल्ला केला. मग काय दोघांमध्ये झटापट सुरू होताच विमानातल्या सर्व प्रवाशांना फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.
त्यांच्यातील वाद हाताबाहेर जात असल्याने विमानातील हवाई सुंदरी दिपक कलालच्या सीटजवळ पोहोचले. त्यांनी या दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दिपकनं राखी सावंतची धमकी देण्यास सुरूवात केली. यावर संतापलेल्या तरुणानं तुझं सिस्टम फाडून टाकेन, तुला आणि तुझ्या राखीला दोघांनाही चपलेनं मारेन अशी प्रत्युत्तरं दिली. दरम्यान आसपासचे प्रवासी हे भांडण पाहून अवाक झाले. ही व्हायरल व्हिडीओ ६० लाखांपेक्षा अधिकच्या युजर्सने पाहिले आहे. खरं तर या व्हिडीओमधील भांडण खरं नाहिये. क्रू मेंबर्सच्या ट्रेनिंगसाठी ही रिल बनवण्यात आला आहे. पण नेटकरी मात्र या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत दिपक कलालची फिरकी घेत आहेत.
“आली मधुबाला…”, ‘श्री गणेशा’ चित्रपटातलं आयटम साँग रिलीज