Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कुटुंबियांसह पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज- भाग १’, केले चित्रपटाचे भरभरून कौतुक

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या टीमसोबत ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपटही पाहिला.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 25, 2024 | 05:26 PM
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कुटुंबियांसह चित्रपटाच्या टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज- भाग १’, केले चित्रपटाचे भरभरून कौतुक

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कुटुंबियांसह चित्रपटाच्या टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज- भाग १’, केले चित्रपटाचे भरभरून कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

संदीप मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा बहुप्रतिक्षित नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी मनाला अभिमान वाटावा, असा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे हवा असताना या चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, महाराणी दमयंती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पना राजे प्रतापसिंह महाराज भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची सातारा येथील जल मंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या ठाकूर अनुप सिंग, निर्माते संदीप मोहिते-पाटील, दिग्दर्शक तुषार शेलार आणि चित्रपटाच्या इतर टीमने जल मंदिर पॅलेसमधील प्रसिद्ध आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला नमन करत, देवीची पूजा करून देवीचे आशीर्वाद घेतले. सोबतच पॅलेसची सैर घडवत असताना उपस्थितांसोबत संवादही साधला. याव्यतिरिक्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या टीमसोबत ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपटही पाहिला.

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग १’ चित्रपटातील औरंगजेबाच्या छाताडावर लाथ मारून हिंदुत्वाला मिठी मारणारा सीन व्हायरल!

चित्रपटाचा ट्रेलरचेही पहिले सादरीकरण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्यासमोर करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसाठी या खास शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले आहे.

चित्रपटाचे कौतुक करताना राजमाता कल्पना राजे प्रतापसिंह महाराज भोसले म्हणाल्या, ” लाजवाब चित्रपट बनला आहे. आजच्या काळात इतिहासाचे जतन करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे असे चित्रपट वरचेवर बनले पाहिजेत आणि हे काम संदीप मोहिते-पाटील, तुषार शेलार आणि त्यांच्या टीमने केले आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांचे हे योगदान निश्चितच मोलाचे आहे. आज आमच्यासाठी या शोचे खास आयोजन केले त्यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार. चित्रपट तर उत्तम आहेच त्यात भर टाकली आहे ती, कलाकारांनी. प्रत्येकाने आपली व्यक्तिरेखा उत्तम वठवली आहे. प्रत्येकाने हा चित्रपट अवश्य पाहावा.”

अल्लू अर्जुन आणि श्रीलीलाच्या ‘पुष्पा २’मधल्या ‘किस्सीक’ गाण्याचा अर्थ काय ? वाचा सविस्तर

महाराणी दमयंती उदयनराजे भोसले म्हणतात, ” या चित्रपटाच्या निमित्ताने महाराजांचे शौर्य आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. चित्रपटातील दिग्दर्शन, संवाद, अभिनय, व्हीएफएक्सचा सुयोग्य वापर या आणि अशा अनेक बाबींमुळे हा चित्रपट अधिकच सर्वोत्कृष्ट बनला आहे. ट्रेलर बघूनच हा चित्रपट पाहाण्याची प्रचंड इच्छा झाली होती आणि अखेर ती पूर्ण झाली.”

निर्माते संदीप मोहिते-पाटील म्हणतात, ” सर्वात आधी मी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो की, आज त्यांनी ही संधी आम्हाला दिली. हा आमच्यासाठी खूप खास क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वारसदारांसाठी या चित्रपटाचे खास आयोजन आम्हाला करता आले, यापेक्षा मोठे भाग्य कोणते असूच शकत नाही. ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, त्यांच्या वारसदारांना हा चित्रपट आवडणे, त्यांच्याकडून कौतुक होणे, हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. खरंतर हा आनंद मी शब्दांत व्यक्त करूच शकत नाही. या सगळ्या मेहनतीचे चीज झाले. आता प्रेक्षकांनीही असेच आमच्यावर भरभरून प्रेम करावे, इतकीच अपेक्षा.”

सुजय डहाकेच्या ‘तुझ्या आयला’चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच

दिग्दर्शक तुषार शेलार म्हणतात, ”ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे, त्यांच्या वारसदारांनी हा चित्रपट पाहिला आणि तो त्यांच्या पसंतीसही उतरला, हे सगळेच स्वप्नवत आहे. हा क्षण अत्यंत भावनिक आहे. सध्या प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला भरपूर प्रेम मिळत आहे. आज या पवित्र स्थळी येऊन, या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा चित्रपट नक्कीच देशभरात नक्कीच यशस्वी होईल, याची खात्री आहे.”

संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत, आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर मोहिते-पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम, आणि केतन राजे भोसले यांनी केली आहे. चित्रपटात अभिनेता ठाकुर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळेल. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट मराठीत प्रदर्शित झाला असून येत्या २९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशात हिंदी भाषेतव प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Dharmakshak mahavir chhatrapati sambhaji maharaj part 1 marathi movie watch chhatrapati udayanraje bhosle with family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 05:26 PM

Topics:  

  • marathi film
  • Udyanraje bhosale

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.