शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांनी सिनेमाला चांगलच डोक्यावर घेतलं होतं. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता त्याचा दुसरा भाग ‘धर्मवीर 2’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला.
[read_also content=”विक्रांत मेस्सीचा ’12वी फेल’ ऑस्करच्या शर्यतीत! 2024 मध्ये होणाऱ्या पुरस्कारासाठी एंट्री https://www.navarashtra.com/movies/vikrant-messy-12th-fail-entry-in-oscars-2024-nrps-484058.html”]
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्याचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत”. असं ते म्हणाले.
धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. आनंद दिघेंचं व्यक्तिमत्त्व, त्यांनी केलेली समाजपयोगी काम, कित्येक कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या मदतीला धावुन जाण्याचा त्यांच्या स्वभावाने कसं त्यांनी सगळ्यांना आपलसं केलं होतं हे त्यातुन सांगण्यात आलं होत. आता दुसऱ्या भागात नेमकं काय दाखवलं जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धर्मवीर 2’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे (Pravin Tarde) निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे.