‘धूम ४’ मध्ये रणबीर कपूर एक नव्या आणि हटके लूकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या लूक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शिवाय, रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘लव्ह अँण्ड वॉर’ आणि ‘रामायण: भाग १’ या दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आणि आता त्यानंतर अभिनेता ‘धूम ४’मधून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता अशातच या दरम्यान, ‘धूम ४’ शूटिंग डेटबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे.
Azaad Review: अजय देवगणचा हा चित्रपट करेल तुम्हाला भावुक; राशा थडानी-अमन देवगणने जबरदस्त पदार्पण!
रणबीर कपूरचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून ‘धूम ४’ सोबत जोडले जात आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धूम ४’च्या शुटिंगला एप्रिल २०२६ पासून सुरुवात होणार आहे. काही अफवांनुसार, चित्रपटात रणबीर एक गुन्हेगार किंवा एक हिरोच्या भूमिकेत दिसू शकतो, जो धूम फ्रँचायझीमधील इतर पात्रांपेक्षा वेगळा असू शकतो. शूटिंगसंबंधित अपडेट समोर आल्यानंतर आदित्यने विक्की कौशलला चित्रपटात दिसण्याची ऑफर दिली आहे. यादरम्यान रणबीर कपूर चोराची भूमिका साकारणार असून विकी कौशल पोलिसाची भूमिका साकारणार आहे. पण अभिषेक बच्चन पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, चित्रपटातून अभिषेकचा पत्ता कट केला आहे.
‘धूम ४’साठी रणबीर कपूरचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. यामुळेच रणबीरला निर्मात्यांनी या चित्रपटापूर्वी त्याच्या सर्व चित्रपटांचे काम पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे. यानंतर ‘धूम ४’साठी तो वेगळा मेकओव्हर करणार आहे. पण अभिनेत्याचा नेमका लूक कसा असेल हे कळायला वेळ लागेल. याआधी असे म्हटले जात होते की, निर्माते चित्रपटासाठी दक्षिणेकडील खलनायकाच्या शोधात आहेत. यानंतर ज्युनियर एनटीआरचे नाव समोर येत होते. मात्र, निर्मात्यांनी अद्याप कोणतेही अपडेट दिलेले नाही. पण एनटीआरच्या नावाची चर्चा होत आहे कारण तो YRF Spy Universe चित्रपटात खलनायक बनत आहे. ‘वॉर २’ नंतर, ‘धूम ४’ मध्ये ज्युनियर एनटीआर दिसणार का ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. सध्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. पण अपडेट असे की, एक नाही तर दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यात कोण कोण असेल ? निगेटिव्ह रोल, पॉझिटिव्ह रोल कोण साकारणार याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
Saif Ali Khan Attacked: सैफ हल्लाप्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित हा आरोपी नाही; पोलिसांचं स्पष्टीकरण