Saif Ali Khan Attacked: सैफ हल्लाप्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित हा आरोपी नाही; पोलिसांचं स्पष्टीकरण
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (१७ जानेवारी) सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं, पण ताब्यात घेतलेला हा संशयित तो आरोपी नसल्याची माहिती स्वत: पोलिसांनी दिली आहे. सैफ अली खानच्या हल्लेप्रकरणात ताब्यात घेतलेला संशयित आरोपी नसून अद्याप कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
याबद्दलची माहिती स्वत: पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिलेली आहे. सध्या पोलिस अभिनेत्याच्या हल्लाप्रकरणात जितकेही संशयित आहेत, त्यांची चौकशी करीत आहेत. पोलिसांच्या विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रा पोलिस स्थानकात आणलेला हा संशयित संशयितच होता. संशयिताला ह्या प्रकरणासंबंधित आणखी प्रश्न विचारला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
संशयिताने दिलेली माहिती पोलिसांना पुढे तपास करण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे. स्वत: पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हा आरोपी नाही. अद्याप कोणालाही पोलिसांनी अभिनेत्याच्या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलं नाही. दरम्यान, शाहरुख खानच्या घरीही १४ जानेवारीला एका अनोळखी व्यक्तीकडून सीडीच्या माध्यमातून त्याच्या घराची पाहणी करण्यात आली होती. त्याच्या घराची रेकी करण्यात आली होती. मुख्य बाब म्हणजे, अभिनेत्याच्या घरी अनोळखी व्यक्तीकडून रेकी केल्यानंतर पोलिस स्थानकात त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
सैफवर झालेल्या हल्ल्याबाबत अखेर करीनाने सोडले मौन, म्हणाली, “हा दिवस माझ्या कुटुंबासाठी…
दरम्यान, अभिनेत्यावर हल्ला करणारा व्यक्ती नालासोपारा- विरारच्या दिशेने निघाल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळालेली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच दिशेने आपल्या तपासाची चक्रे फिरवल्याची माहितीही सध्या मिळत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांकडून तपासलं जातंय. हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून अधिकाधिक प्रयत्न केला जात आहे.