
दिव्या खोसलाने आलिया भट्टवर गंभीर आरोप करत दाखवला 'जिगरा', म्हणतेय, "स्वतः तिकिटं खरेदी केले आणि..."
सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘जिगरा’सिनेमा कमालीचा चर्चेतला विषय ठरला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज झालेला ‘जिगरा’ सिनेमाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत नाहीत. ‘जिगरा’ आणि दिव्या खोसला हिचा ‘सावी’ चित्रपटाचे कथानक सारखे असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये झाली होती. या दोन्ही सिनेमांतील आपआपसातील वाद संपतो ना संपतो तेच, आता थेट दोन्हीही अभिनेत्रींमध्येच थेट जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दिव्या खोसलाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आलियावर थिएटर ओसाड पडले असताना, ‘जिगरा’चे बनावट बॉक्स ऑफिस कलेक्शन दाखवल्याचा आरोप आलियावर लावला आहे.
दिव्या खोसलाने आलियाविरोधातील तिचा राग इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काढला आहे. रिकामा थिएटरचा फोटो काढून दिव्याने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. दिव्याने आलियाची कमालीची खिल्ली उडवली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिव्या म्हणते, “मी सिटी मॉलमधल्या पीव्हीआरमध्ये ‘जिगरा’ सिनेमा पाहायला गेले होते. ते अख्खं थिएटर रिकामं होतं. खरं तर तेच नाही तर सगळेच थिएटर्स रिकामी होती. आलिया भट्टमध्ये खरंच खूप जिगरा आहे. आलियाने स्वतः तिकिटं खरेदी केली आणि बनावट कलेक्शन जाहीर केले आहे. मला आश्चर्य वाटतं की बिकाऊ मीडिया गप्प का आहे? सत्य केव्हाच खोटं बोलत नाही. दसऱ्याच्या शुभेच्छा.”
दिव्या खोसलाने आलिया भट्टवर गंभीर आरोप करत दाखवला ‘जिगरा’, म्हणतेय, “स्वतः तिकिटं खरेदी केले आणि…”
सोशल मीडियावर दिव्या खोसलाने आलिया भट्टची केलेली पोलखोल कमालीची चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘जिगरा’चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ११ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘जिगरा’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत आलिया भट्ट, वेदांग रैना आणि मनोज यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ४.५५ कोटींची कमाई केली आहे. ‘जिगरा’चित्रपटाची निर्मिती आलियाने करण जोहरच्या सहकार्याने केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन वसन बाला यांनी केले आहे.
दिव्या खोसलाचा ‘सावी’ चित्रपट यावर्षी मे महिन्यात रिलीज झाला होता. या चित्रपटात दिव्या तिच्या पतीला तुरुंगातून सोडवण्याचा प्रयत्न करते. जिगराचीही अशीच कथा आहे. ज्यामध्ये आलियाचा भाऊ वेदांग रैना परदेशातल्या एका तुरूंगात अडकलेला असतो. त्या तुरूंगातून ती आपल्या भावाला सोडवण्याचा प्रयत्न करते. दोन्ही चित्रपटाची कथा सारखीच असल्यामुळे नेटकऱ्यांनी आलियालाही ‘जिगरा’सिनेमाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना ट्रोल केले होते.
हे देखील वाचा – ‘वेट्टयान’ने जगभरात उडवली खळबळ, चित्रपटगृहात अमिताभ- रजनीकांतची जोडी घालतेय धुमाकूळ!
‘सावी’ आणि ‘जिगरा’ सिनेमाची कथा सारखीच असल्याचे कळल्यानंतर दिव्याने एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत ती म्हणतो, “मला हा प्रश्न सारखा विचारला जात आहे की, ‘सावी’ आणि ‘जिगरा’चे कथानक सारखे आहेत का? पण यावर मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की, प्रेक्षकांचे प्रेम आणि देवाच्या आशीर्वादाने ‘सावी’ने स्वतःला खूप सिद्ध केले. थिएटर आणि ओटीटी अशा दोन्ही ठिकाणी ‘सावी’चित्रपटाला पसंती मिळाली आहे. ‘जिगरा’ आणि ‘सावी’मध्ये साम्य असले तरी, मला वाटते प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा प्रवास असतो आणि कधी कधी दोन प्रॉडक्शन हाऊस एकाच कथेवर चित्रपट बनवू शकतात.”