Sonalee Kulkarni Birthday
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याच्याराच्या घटनांमध्ये वाढ होतान दिसत आहे. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याच्याराची घटना घडली. त्यानंतर आणखी काही वेगवेगळ्या भागांतही अत्याचाराची घटना घडली होती. या सर्व घटनांचा आधार घेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. आज दसरा आहे, दसरा म्हटलं की, रावनदहन आलंच… देशातल्या अनेक भागांत आजही रावन दहन केलं जातं. रावन दहन करण्या मागचा हेतू म्हणजे, वाईटाचा नाश होऊन चांगल्या गोष्टीची सुरुवात चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी… अभिनेत्रीने दसरा केव्हा साजरा केला जाईल ? यावर प्रश्नावर भाष्य केले आहे.
हे देखील वाचा – ‘वेट्टयान’ने जगभरात उडवली खळबळ, चित्रपटगृहात अमिताभ- रजनीकांतची जोडी घालतेय धुमाकूळ!
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने एका पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, “खरा दसरा तेव्हा असेल, जेव्हा प्रत्येक बलात्कार करणाऱ्या नराधमांना भर चौकात जाळले जाईल, त्या रावणाला काय जाळायचे ? ज्याने सीताला स्पर्श सुद्धा केला नाही…” अभिनेत्रीची ही इन्स्टा पोस्ट तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये ह्या पोस्टरमध्ये जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणावर अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केलेली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून, चौकामध्ये रावणाला जाळण्यापेक्षा बलात्कार करणाऱ्या नराधमाला जाळाले पाहिजे. तेव्हाच खरा दसरा साजरा केला जाईल, असा आपल्याला बोध या पोस्टच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. सध्या सोनाली सन मराठीवरील ‘होऊदे चर्चा…’ कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचं सोनाली होस्टिंग करत असून इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींची ती मुलाखत घेताना दिसत आहे. तिच्या ह्या कार्यक्रमामध्ये राज्याच्या राजकारणातीलही महत्वाचे मंडळी येतात. नुकतंच या कार्यक्रमात नेते किरीट सोमय्या ह्यांनी हजेरी लावली होती.
हे देखील वाचा- नताशा स्टॅनकोव्हिक खरोखर एल्विश यादवला डेट करतेय ? ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य आलं समोर






