ekda kaay zala
‘एकदा काय झालं!!’ (Ekda Kaay Zala) या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाचा टीझर कधी येणार याविषयी उत्सुकता होती. आता या चित्रपटाचा टीझर (Ekda Kay Zala Teaser) प्रदर्शित झाला आहे. तसेच या चित्रपटातील गाणीही आज प्रदर्शित करण्यात आली. प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan), ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) आणि प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) यांच्या हस्ते टीझर लॉन्च करण्यात आला. तर सुनिधी चौहान, शुभंकर कुलकर्णी यांनी चित्रपटातील गाणी सादर केली.
अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. टीझरमध्ये एक शाळा दिसत आहे. अनेक लहान मुले दिसत आहेत. गोष्टी सांगणाऱ्या माणसावर आधारित ही चित्रपटाची कथा आहे. तसेच बाबा आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी आणि नात्यांवर नवा प्रकाश टाकणारी अशी या चित्रपटाची कथा आहे. मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.
[read_also content=”अभिनेता चियान विक्रमच्या हार्ट अॅटॅकची अफवा, दिली ‘ही’ प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/entertainment/actor-chiyaan-vikram-statement-about-rumours-of-his-heart-attack-nrsr-303756/”]
डॉ. सलील कुलकर्णी यांच्या चित्रपटातील गाण्यांची चर्चा नेहमीच होत असते. या चित्रपटात ‘भिमरूपी’, ‘रे क्षणा’, ‘राम आणि श्याम’, ‘बाळाला झोप का गं येत नाही’ ही अंगाई गीत आहेत. यापैकी ‘रे क्षणा’ या गाण्याला शंकर महादेवन, तर ‘बाळाला झोप का गं येत नाही’ या गाण्याला सुनिधी चौहान यांनी गायली आहेत. ‘राम आणि श्याम’ हे गाणं शुभंकर कुलकर्णीने गायले आहे, तर ‘भिमरूपी’ या गाण्याला अनेक बाल गायकांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटातील गीते संदीप खरे, समीर सामंत आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहेत.