फोटो सौजन्य - Social Media
मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मराठी मालिकेतील शेवंता हे पात्र तिने साकारले होते. या पात्रातून अपूर्वा मराठी माणसाच्या घराघरात पोहचली. तिचे रात्रीस खेळ चाले या मालिकेतील पात्र आणि तिचे अभिनय फार गाजले. दरम्यान, अपूर्वाने तिच्या इंस्टागरं हॅन्डलवर एक पोस्ट केली आहे. ही एक emotional पोस्ट आहे. तिने तिच्या भावना या पोस्टमध्ये मांडल्या आहेत. तिने, नुकतेच ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अपूर्वा दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कोकणातील पवित्र स्थळ श्री क्षेत्र हरिहरेश्वराच्या समुद्रकिनारी उभी आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये अपूर्वा भावुक झालेली दिसत आहे.
हे देखील वाचा : Karwa Chuath 2024: ‘या’ ‘सेलिब्रिटी’ यंदा साजरी करणार लग्नानंतरची पहिली करवा चौथ
अपूर्वाने केलेल्या या पोस्टखाली तिने भावुक होण्याचे कारण स्पष्ट केले आहे. ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे कि,” सर्वानाच माहीती आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे… प्रत्येकाला एक ना एक दिवस या सुंदर जिवनाचा निरोप घ्यायचाच आहे… आणि यां एकमेव मिळालेल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला लाभलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यायला ( detachment) हे कोणाला जमलय..?? माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरूच आहे…. त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा त्याच वळनावर फिरून आले.. श्री. क्षेत्र हरिहरेश्वर..(कोंकण दक्षिण काशी).., ही तिचं जागा जिथं मी माझ्या बाबांचं आणि भावाच अस्थिविसर्जन केलं होतं..आणि त्यांच ठिकाणीं त्या अथांग सागरावर पुन्हा एकदा उभ राहील्यावर थंड पाण्याचां स्पर्श जेव्हा झाला . तेंव्हा जणू अस वाटल की पप्पा आणि ओंकार ला घट्ट मिठी मारली आहे.आणि आज या अथांग सागरकिनारी दाटुन आलेला ढग सुद्धा बरसला, त्याचे सोबतच दाटून आलेल्या मनाचा सुद्धा डोळ्यातून बांध फुटला.. आणि मी मनसोक्त रडले….! आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळया emotions आपणं अनुभवतो,शिकतो, अंमलात आणतो.. परंतू detachment ही एकमेव असं emotion आहे. की ते कोणी शिकवत नाही.त्याचा शोध आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो .. असो detachment जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असाच सुरु राहील. परंतू जेव्हा जमेल तेव्हा यां दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं..! म्हंणजे मन हलक होत. मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने…. लवकरच….❤️”
हे देखील वाचा : स्वप्निल जोशी पोहचला बद्री केदारनाथच्या दर्शनाला; पोस्ट केली शेअर
या पोस्टने कॉमेंट्समध्ये चाहतेही भावुक झालेले दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी अपूर्वाला भावनिक साद दिले आहे, तसेच तिचे सांत्वन केले आहे.