फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशी नेहमीच आपल्या चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवतो. तो नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेला असतो. मग ते खास क्षण वैयक्तिक आयुष्यातील असो किंवा व्यावसायिक, प्रत्यके क्षण तो त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकतेच, १८ ऑक्टोबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा झाला. सिनेसृष्टीतून त्याच्यावर अभिनानंदनाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी त्याला अमाप शुभेच्छा दिल्या. स्वप्नीलने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने केदारनाथच्या दर्शन घेतले आहे. त्याने हा संपूर्ण अनुभव टिपून त्याच्या चाहत्यांशी शेअर केला आहे.
हे देखील वाचा : वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार ‘गोपी बहू’, मॅटर्निटी शूटचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
या पोस्टच्या माध्यमातून स्वप्नीलने चाहत्यांना सांगितले आहार कि, “कलाकार म्हणून कामाच्या निमित्ताने असो किंवा अनेक कारणाने आपण प्रवास करत असतो आणि बऱ्याचदा हा प्रवास आपसूक पने घडून येतो ! असाच बद्री केदारनाथचा हा प्रवास. कधी कधी देवाचं स्वतःताहून बोलावणं येतं आणि यातून एक वेगळीच ऊर्जा मिळते मी या सगळ्यासाठी खूप कृतज्ञ आहे”
अभिनेता स्वप्नील जोशीसाठी यंदाचे वर्ष काही खास होते. या वर्षांमध्ये स्वप्नीलने निर्माता म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. महत्वाचे म्हणजे स्वप्नीलने प्रोड्युस केलेला पहिला सिनेमा “नाच गं घुमा” सुपरहिट ठरला. त्याचे हे निर्मिती विश्वातील पदार्पण काही खास होते. त्याने निर्मिती केलेले “बाई गं” आणि “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यामुळे निर्माता म्हणूनही त्याला चांगलेच यश मिळत आहे.
हे देखील वाचा : Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात नवी जोडी! चाहत पांडेने या हँडसम अभिनेत्याबद्दल दिली पसंतीची कबुली
स्वप्नीलचे पुढील प्रोजेक्ट्स काय? जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. स्वप्नील आगामी काळात “जिलबी”, “सुशीला-सुजीत” या चित्रपटांचं भाग असणार आहे. त्याचबरोबर तो आणखी काही वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. कामाच्या व्यापातून वेळ काढून स्वप्नील कुटुंबासोबत वेळ घालवतो, प्रवास करतो आणि आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा अनुभव घेतो. त्यामुळे तो एक उत्तम अभिनेता आणि निर्माता म्हणूनच नव्हे तर कृतज्ञ व्यक्तीमत्व म्हणूनही चाहत्यांच्या हृदयात आपली जागा कायम राखतो.