फोटो सौजन्य - Social Media
दक्षिण कोरियन सिनेमातून जगभरात नावाजलेली अभिनेत्री किम से-रॉन काळाच्या पडद्याआड गेली आहे. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी मृत्यू नशिबी ओढवल्याने जभरातील सिनेप्रेमींना धक्का बसला आहे. किम से-रॉनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर जणू आक्रोशच केला आहे. किम से-रॉन १६ फेब्रुवारी २०२५ रोजी तिच्या राहत्या घरी मृत आढळून आली आहे. तिच्या अचानक अशा जाण्याने जगभरातील सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही आहे. पोलीस या प्रकरणावर तपास करत आहेत.
किम से-रॉनची मैत्रीण तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आली. दरवाजा अनेकदा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मैत्रिणीने आपात्कालीन सेवांना त्वरित संपर्क केला. आतमध्ये किम से-रॉनचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय टीम आणि पोलीस घटनास्थळी पोहचताच त्यांनी तपासाला सुरुवात केली परंतु तपासात कुणी घुसखोरी केल्याचे निशाण काहीच समोर आले नाहीत. तरी अद्याप प्रयत्न सुरु आहेत.
अवघ्या ९ वर्षांच्या वयात किम से रोनने तिच्या करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. किम से रोनला ओळख २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘A Brand New Life’ या सिनेमातून मिळाली. तसेच तिचा २०१० साली प्रदर्शित झालेला सिनेमा ‘The Man From Nowhere’ या सिनेमानेदेखील प्रचन्ड प्रमाणात प्रेक्षकवर्ग आकर्षित केला होता. किम से रोनने अनेक K Dramas मध्ये देखील काम केले आहे. तिने ‘Listen to My Heart’, ‘The Queen’s Classroom’ आणि ‘Hi! School-Love On’ या सिरीजमध्ये देखील काम केले आहे.
मुळात, तिचे जीवन फार संघर्षमयी होते. काऱीरमध्ये तिने फार उंची मिळवली पण तिच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तिने अनेक गोष्टींचा सामना केला होता. ती वयाने अवघ्या २४ वर्षांची होती. २०२२ साली तिच्यावर ड्रंक अँड ड्राइविंग प्रकरणामुळे कारवाई करण्यात आली होती. यानंतर तिने या क्षेत्रातून ब्रेक घेतला. पैशांच्या कमतरतेमुळे तिने पार्ट टाइम जॉबही सुरु केला होता. अलीकडेच तिने सिनेसृष्टीत पुन्हा इंट्री घेण्याचा निश्चय केला होता. परंतु आरोग्यासंबंधित काही समस्यांमुळे तिला हे प्रोजेक्ट सोडावे लागले होते. Bloodhounds’ २०२३’ ही अभिनेत्रीची शेवटची वेब सिरीज ठरली. तिच्या जाण्याची बातमी येताच तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच #RIPKimSaeRon या हॅशटॅगने सोशल मीडियावर वेग धरला आहे. हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करत आहे.