(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Trisha Krishnan Marriage: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या आपल्या चित्रपटांपेक्षा व्यक्तिगत आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तृषाच्या लग्नाविषयी अनेक अंदाज आणि बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत.अलीकडेच एका रिपोर्टमधून तिच्या लग्नासंबंधी मोठा खुलासा समोर आला आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.वयाच्या ४२ व्या वर्षीनंतर ही प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. १० वर्षांपूर्वी या अभिनेत्रीचं लग्न मोडलं होतं. आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.त्रिशा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे तिचा होणारा नवरा?
मीडिया रिपोर्टनुसार, त्रिशा कृष्णनच्या आई वडिलांनी तिच्यासाठी चंदीगढमधील एका प्रसिद्ध बिझनेसमनला पसंत केलं आहे. तो नक्की कोण आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र लवकरच त्रिशा विवाहबंधनात अडकणार आहे.त्रिशाच्या पालकांनी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने तिचं लग्न निश्चित केलं आहे. येत्या काही महिन्यात त्रिशा लग्नबंधनात अडकणार मात्र, त्रिशा किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अभिनेत्री तृषा कृष्णनच्या लग्नाबद्दल याआधीही अनेक वेळा चर्चा झाली आहे. २०१५ मध्ये तृषाने उद्योजक वरुण मैनियनसोबत साखरपुडा केला होता.मात्र काही काळातच त्यांचं नातं तुटलं, आणि ही बातमी ऐकून तिच्या अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. २०२० मध्ये एका मुलाखतीत त्रिशाने भविष्यातील लग्नाच्या योजनेबद्दल बोलताना सांगितले होते की, तिला लग्नाची घाई नाही आणि योग्य वेळी त्याबाबत ती निर्णय घेईल.२०२४ हे वर्ष त्रिशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलं आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ मालिकेत ‘कुंडवई’च्या भूमिकेत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली, तर ‘लियो’मध्येही तिने केलेल्या अभिनयाचं कौतुक झाले होते.