प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने गाण्याची ऑफर धुडकावली, ५० लाखांची ऑफर नाकारण्याचं नेमकं कारण काय?
प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आणि ‘बिग बॉस १४’चा पहिला उपविजेता राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. क्रिकेटर विराट कोहलीवर केलेल्या टिप्पणीमुळे गायकाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नुकतंच विराटने राहुलला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे. अनब्लॉक केल्यानंतर आता हा वाद शांत शमला आहे. तोच पुन्हा एकदा गायक राहुल वैद्य चर्चेत आला आहे. त्याला तुर्कीमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी ऑफर आली होती. पण त्याने ती थेट ऑफर नाकारली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
महिन्याभरापासून भारत- पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तुर्की आणि चीन हे दोन्हीही देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत. त्यामुळे भारताकडून पाकिस्तानसह तुर्की आणि चीनमधील आयात- निर्यात करणाऱ्या वस्तूंवर निर्बंध लादले आहे. तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शिविला आहे. त्यामुळे भारतातील अनेक कलाकार तुर्कीवर बहिष्कार टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या यादीत राहुल वैद्यचाही समावेश झाला आहे. त्याने त्याला तुर्कीमधून आलेली ऑफर नाकारली आहे.
एक गाडी, पैशांनी भरलेली बॅग आणि अनेक रहस्य, ‘गाडी नंबर १७६०’चा होणार लवकरच खुलासा
बॉम्बे टाईम्सला मुलाखतीमध्ये राहुल वैद्य म्हणाला की, “मला तुर्कीमधून एका लग्नाची ऑफर आली. हे लग्न तुर्कीतल्या अंताल्यामध्ये होते. हा लग्नसोहळा ५ जुलैला होणार होता. त्या लग्नामध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी मला ५० लाख रुपये मिळणार होते. पण मी ती ऑफर नाकारली. मी हा निर्णय राष्ट्रहितासाठी घेतला आहे. ऑफर चांगली होती. शिवाय ते मला ५० लाख रुपये देण्यासाठीही तयार झाले होते. पण शेवटी, कोणतंही काम हे पैसा, प्रसिद्ध आणि देशापेक्षा सर्वश्रेष्ठ नसू शकतं, असं मला वाटतं. त्यांनी मला पैसे देण्याचाही प्रयत्नही केला होता, पण मी ती ऑफर स्पष्टपणे नाकारली होती. मुद्दा पैशांचा नसून मुद्दा देशहिताचा होता. तो सर्वाधिक महत्वाचा होता. ”
“कायमच आपण आपल्या देशासोबत उभं राहणं फार महत्वाचं आहे. माझ्या देशाचा शत्रु असलेल्या देशामध्ये मी जाणार नाही. जे माझ्या देशाचा सन्मान करणार नाहीत, मला त्या देशात जायचं नाही. कोणत्याही देशातील नागरिकांमुळेच तो देश ओळखला जातो. जर आमच्या देशाविरोधात कोणीही काही बोललं तर आम्ही ते सहन करणार नाहीत. भारतातले लोकं तुर्कीमध्ये पैसे खर्च करतात आणि तिथे लग्न आयोजित करून त्यांना मोठा व्यवसाय देतात. आपण त्यांना कोट्यवधींचा महसूल देतो. ते आपल्याला असा प्रतिसाद देत आहेत. जो देश आपल्याशी प्रामाणिक नाही, त्या देशात आपण पैसे खर्च करणे कसे सुरू ठेऊ शकतो. जो कोणी माझ्या देशाविरुद्ध आहे, तो माझ्याविरुद्ध आहे, हे इतकं सोपं आहे”, अशा भावना राहुल वैद्यने मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या आहेत.