(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
Ismail Darbar on Gauahar Khan: बॉलिवूड संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार सध्या आपल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतीच विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत, त्यांची सून आणि अभिनेत्री गौहर खान हिच्या करिअर आणि काम करण्याविषयी स्पष्ट मत व्यक्त केलं.
इस्माइल दरबार यांनी म्हटलं की, “मी माझ्या सून गौहर खानचे चित्रपट किंवा टीव्ही शोज पाहत नाही. आणि मी लग्नानंतर महिलांनी काम करावं, याच्या विरोधात आहे.” पुढे ते म्हणाले, “गौहर एक उत्कृष्ट आई आहे, याबद्दल शंका नाही. पण माझ्या दृष्टिकोनातून, लग्नानंतर आणि विशेषतः आई झाल्यानंतर महिलांनी घर आणि कुटुंबाला प्राधान्य द्यावं.”
गौहर खान ही अभिनेत्री असून तिने इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबार याच्याशी लग्न केलं आहे. लग्नानंतर गौहर काही प्रमाणात करिअरपासून दूर गेली असून, इस्माइल दरबार यांच्या म्हणण्यानुसार, ते स्वतः लग्नानंतर महिलांनी काम करणं योग्य मानत नाहीत.
“माझी पत्नी आयशाने केलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे , तिच्या मुलासाठी काम करणे थांबवणे. ती जेव्हा एका शोमधून महिन्याला ५ लाख रुपये कमवत होती, आणि तिला अभिनयाच्या ऑफरही मिळत होत्या, तरी तिने कधीच सांगितलं नाही की तिला गाणं गायचं आहे किंवा अभिनय करायचा आहे. इतकेच नाही, जेव्हा मला पैशांची गरज होती तेव्हाही तिने कधीही मी पैसे कमावते असे म्हणाली नाही.”
‘झुंड’ फेम प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची निर्घृण हत्या; नागपूर हादरलं
इस्माइल दरबार यांना विचारण्यात आलं, “तुम्ही तुमच्या सून गौहर खानचं काम पाहता का?” यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं: “मी रुढीवादी कुटुंबातील, जुन्या विचारांचा माणूस आहे. जेव्हा चित्रपटात काही रोमँटिक सीन दाखवले जातात, तेव्हा ते पाहण्याचं आम्ही टाळतो. आजही आमच्या घरात तेच होतं.” इस्माइल दरबार पुढे म्हणाले, “गौहर आता आमच्या कुटुंबाचा भाग आहे. तिच्या प्रतिष्ठेची आणि सन्मानाची जबाबदारी आता आमच्यावर आहे.पण, तू आता काम करू नकोस, असे मी तिला सांगू शकत नाही; तो झैदचा म्हणजेच तिच्या नवऱ्याचा अधिकार आहे. ज्या गोष्टींचा मला त्रास होईल, अशा गोष्टीत मी गुंतत नाही. मला माहीत आहे, जेव्हा मी तिचे काम पाहीन, तेव्हा मी ते सहन करू शकणार नाही. जर तसे झाले तर मी त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारेन.”