जगातली पहिली विश्वसुंदरी काळाच्या पडद्याआड, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. जगातील सर्वात पहिली मिस वर्ल्ड किकी हॅकन्सन यांचे निधन झाले आहे. किकी हॅकन्सन यांचे वृद्धापकळाने निधन झाले असून त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हॅकन्सन यांचे निधन त्यांच्या कॅलिफॉर्नियातल्या राहत्या घरी झाल्याची माहिती मिळत आहे. १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा पहिला मुकुट विराजमान झाला.
हे देखील वाचा – तेजस्विनी पंडितचा ‘येक नंबर’ चित्रपट आता ओटीटीवर येणार; कधी आणि कुठे होणार रिलीज…
जगातल्या पहिल्या विश्वसुंदरीने आज जगाचा निरोप घेतला आहे. किकी यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, किकी हॅकन्सन यांचा मृत्यू मध्यरात्री झोपेतच झाला आहे. हॅकन्सन कॅलिफॉर्नियातील त्यांच्या घरी होत्या. त्यावेळी त्यांचे कुटुंबीयही होते. किकी हॅकन्सन यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या मुलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. “किकी हॅकन्सन यांना ४ नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच देवाज्ञा झाली.” अशी माहिती सोशल मीडिया अकाऊंटवरुन देण्यात आली.
किकी हॅकन्सन ( First Miss World) यांनी १९५१ मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा त्या जिंकल्या. किकी हॅकन्सन यांनी पटकावलेल्या मिस वर्ल्ड किताबानंतर ही परंपरा जगभरात सुरू झाली. ‘मिस वर्ल्ड’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत किकी हॅकन्सन यांना आदरांजली वाहण्यात आली. स्वीडनमध्ये जन्मलेल्या किकी हॅकनसनने १९५१ मध्ये लंडनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस वर्ल्डचा ताज जिंकला आणि इतिहास रचला. ही स्पर्धा २९ जुलै १९५१ पासून लिसियम बॉलरूममध्ये सुरू झाली.