मोठी बातमी! सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्याची ओळख पटली; CCTV फुटेज आलं समोर
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री धारदार शस्त्राने एका अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला. अज्ञाताने अभिनेत्यावर ६ वार केले होते. त्यातील २ वार अत्यंत खोलवर आणि तर बाकीच्या जखमाही किरकोळ आहेत. त्यानंतर अभिनेत्याला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ज्यावेळी अभिनेत्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब घरातच होतं. सैफवर आज सकाळी यशस्वी रित्या डॉक्टरांच्या टीमकडून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Saif Ali Khan वर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात, काय माहिती समोर?
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज आलं आहे. त्यामध्ये हल्लेखोराचा चेहरा दिसत असून, तो इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करून पळून जाताना दिसत आहे. संशयित हल्लेखोराचा फोटो पोलिसांना इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून मिळाला असून त्या आधारे पोलिस पुढची चौकशी करीत आहेत. त्या आरोपीचा फोटो तुम्ही पुढे शकणार आहात. अभिनेत्यावर हल्ला करणारा हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिस चौकशी अंती समोर आलं आहे. चोरीच्या उद्देशानेच चोर अभिनेत्याच्या घरात घुसल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. हल्लेखोराची ओळख पोलिसांना अगोदरच पटली होती, त्यातच आता फोटोही पुढे आलाय.
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्याची ओळख पटली; CCTV फुटेज आलं समोर, पोलिसांकडून तपास सुरु
हा एक सराईत गुन्हेगार असून यापूर्वी हल्लेखोराविरोधात पोलिस स्थानकात घरफोडी आणि चोऱ्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत. व्हायरल होणारा फोटोमध्ये सराईत गुन्हेगार जिन्याच्या मदतीने सैफच्या घरापर्यंत पोहोचला. यापूर्वी हल्लेखोराने सैफच्या घराची रेकी केली होती. अशी देखील माहिती मिळत आहे. शेजारी असलेल्या बिल्डिंगीमधून आरोपीने सैफच्या घरात प्रवेश केला. त्याला नेमके कुठे जायचे ? कसे जायचे ? हे सर्व माहिती होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पटली असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. चोरी हाच त्याचा प्रमुख उद्धेश असल्याचेही सांगितले जातंय. हा एकच आरोपी होता की, अजूनही यामध्ये कोणाचा समावेश होता, याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय.
अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३११, ३१२, ३३१(४), ३३१(६) आणि ३३१(७) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. दरोडा, प्राणघातक शस्त्रांसह दरोडा, घरात बेकायदेशीरपणे घुसणे (हाऊस ट्रेसपास) आणि घरफोडी तसेच रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय.
“सैफच्या मणक्यात चाकूचं टोक…”, अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती