सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय, हल्लेखोराबद्दल पोलिसांनी केली महत्त्वाची माहिती उघड
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतल्या बांद्रा येथील घरी रात्री उशिरा काही अज्ञातांनी दरोड्याचा प्रयत्न केला. चोरटा आधी केअरचटेकरच्या रुममध्ये शिरला, तिचा आरडाओरडा ऐकून सैफ तिथे पोहोचला. चोरट्याने सैफवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्याच्या हात आणि मणक्याला जखमा झाल्या आहेत. अभिनेत्याला रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्यावर सकाळी डॉक्टरांच्या टीमकडून शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. काही वेळेपूर्वीच अभिनेत्यावर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली असून चोरटा घरात कसा शिरला? यावरही पोलिसांनी माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने अभिनेत्याच्या घरात पायऱ्यांच्या मदतीने प्रवेश केला होता. अभिनेत्यावर मध्यरात्री अडीच वाजता अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. चोरट्याला पाहून घरातील केअरटेकरने आरडाओरडा करत मदतीसाठी अलार्म वाजवला. यानंतर सैफ अली खान खोलीत गेला, तिथे त्याची चोरट्यासोबत वाद झाला. चोरट्याने अभिनेत्यावर सहा वेळा चाकूने वार केला. तसेच घरातील मदतनीसही जखमी झाली आहे, तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर घुसखोर घटनास्थळावरून पळून गेला.
आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी १५ पथके तयार केली आहेत. ही पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. काही वेळापूर्वीच आरोपीची ओळख पटवण्यात आली असून त्याचा फोटोही समोर आला आहे. पोलिसांना आता फुटेजेसच्या माध्यमातून हल्लेखोराला पकडण्यासाठी मदत होत आहे. युद्धपातळीवर आरोपीचा फोटोचा वापर करत त्याचा शोध घेतला जात आहे. हल्ल्याच्या दोन तास आधीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणीही त्या सोसायटीमध्ये प्रवेश करताना दिसत नाही, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सैफ अली खानच्या जखमी मदतनीसला उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
अभिनेत्याच्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दुध विक्रेते, पेपर विक्रेते, अभिनेत्याच्या मुलांना सांभाळणाऱ्या दोन्ही नॅनींचीही चौकशी केली आहे.