Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर आणणार धमाकेदार मेजवाणी, ‘फसक्लास दाभाडे’ चा जबरदस्त पोस्टर रिलीज

‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता 'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 01, 2024 | 04:28 PM
अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर आणणार धमाकेदार मेजवाणी, 'फसक्लास दाभाडे' चा जबरदस्त पोस्टर रिलीज

अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर आणणार धमाकेदार मेजवाणी, 'फसक्लास दाभाडे' चा जबरदस्त पोस्टर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून अमेय वाघ, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

पोस्टरमध्ये एक एकत्रित कुटूंब दिवाळी साजरी सादरी करताना दिसत आहे. यावरून हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाचा धमाका असणार हे कळतेय. मुळात हेमंत ढोमे यांचे चित्रपट हलक्या-फुलक्या पद्धतीने काहीतरी संदेश देणारे असतात. त्यांची एखादा संवेदनशील विषय उत्तमरित्या हाताळण्याची प्रगल्भता कमाल आहे. त्यामुळे हा चित्रपटही काहीतरी हटके असणार, हे नक्की!

 

आपला आनंद व्यक्त करताना निर्माते आनंद एल राय म्हणतात, “दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तुम्हाला भाऊ-बहिणींचे मजेदार आणि भावनिक नातेसंबंध पाहायला मिळतील, त्यासोबतच भावंडांमधील प्रेम आणि नोकझोक पाहायला मिळेल. हास्य आणि हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली ही कथा आपल्यापैकी अनेकांना आपली वाटेल. भावंडांमधली गोड नाती असोत किंवा खेळकर वादविवाद, ही गोष्ट तुमच्या आठवणींना पुन्हा जागं करेल.”

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “हा चित्रपट माझ्या जीवनातील काही अनुभवांवर आधारित आहे. भावंडांची आणि त्यांच्या इरसाल कुटूंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट तुमच्या आमच्या घरात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवेल आपल्या नातेवाईकांची, सग्या सोयऱ्यांची आठवण करून देईल आणि आपण आपल्याच कुटूंबाची कथा मोठ्या पडद्यावर बघतोय असा अनुभव प्रेक्षकांना देईल याची मला खात्री आहे.”

हे देखील वाचा – अभिषेक-ऐश्वर्याचा खरोखर घटस्फोट झालायं का? अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्याची होतेय तुफान चर्चा

‘फसक्लास दाभाडे’ हा टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्यातील एक सहयोगी उपक्रम आहे ज्यामुळे आनंद एल राय, क्षिती जोग आणि हेमंत ढोमे हे पुन्हा एकदा ‘झिम्मा २’ नंतर एकत्र येणार आहेत. २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे वितरण अनिल थडानी यांच्या ए ए फिल्म्सने केले आहे.

हे देखील वाचा – ऐश्वर्याचे डोळे पाहून संजय लीला भन्साळी पडले प्रेमात, पाहताच क्षणी दिली अभिनेत्रीला मोठी ऑफर

Web Title: Fuss class marathi movie released date announce amey wagh siddharth chandekar kshitee jog nivedita saraf in lead role in this movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 04:28 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • kshiti jog

संबंधित बातम्या

“तू आज असतीस तर…”, क्षिती जोगने शेअर केली आजीसाठी खास पोस्ट; म्हणाली…
1

“तू आज असतीस तर…”, क्षिती जोगने शेअर केली आजीसाठी खास पोस्ट; म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.