अभिषेक आणि ऐश्वर्याचं खरोखर घटस्फोट ? अमिताभ बच्चन यांच्या 'या' वक्तव्यामुळे होतेय चर्चा
आज विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस आहे. अभिनेत्री आज ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या बातम्याही माध्यमांवर येत आहेत. या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्याने किंवा बच्चन दाम्पत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. इतक्या महिन्यांपासून घटस्फोटाची चर्चा होत असली तरीही बच्चन दाम्पत्याने बराच काळ मौन बाळगले.
केबीसी १६च्या एका एपिसोडमध्ये, अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांचं नाव घेण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शोदरम्यान अमिताभ बच्चन असे काही बोलले की अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना जोर धरला आहे. शोमधील काही व्हिडिओज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ती व्हिडिओपाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
केबीसीच्या सेटवर अमिताभ अनेकदा त्यांच्या काही वैयक्तिक गोष्टी शेअर करतात. यावेळीही असेच काहीसे घडले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमिताभ ‘कजरा रे’ या सुपरहिट गाण्याचा संदर्भ देत होते. यादरम्यान अमिताभ यांनी अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीचे नावे घेतले. मात्र त्यांनी गाण्याची प्रमुख अभिनेत्री ऐश्वर्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बिग बींच्या तोंडून सुनेचे नाव न ऐकल्यावर अनेकांना विचित्र वाटले. ही गोष्ट बी-टाऊनच्या गॉसिपमध्ये होती की बिग बींनी त्यांची नात आराध्याकडेही दुर्लक्ष केले.
अशाचप्रकारे गेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी नातवंडांचा उल्लेख केला. त्यांनी नव्या आणि अगस्त्यचं नाव घेतलं. पण आराध्याचं नाव घेतलं नाही. मुख्य बाब म्हणजे, केबीसी १६ च्या कोणत्याही भागात अमिताभ यांनी ऐश्वर्या आणि आराध्याच्या नावाचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे मार्ग वेगळे झालेत का? अशी चर्चा जोर धरत आहे. मात्र, बच्चन कुटुंबीयांनी या मुद्द्यावर काहीच भाष्य केलंलं नाही. त्यामुळे बच्चन कुटुंबात चाललंय काय? असा सवाल चाहत्यांना पडला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत असताना आणखी एक चर्चा होत आहे. ती म्हणजे, ‘दसवी फेम’ अभिनेत्री निम्रत कौरसोबत अभिषेकचं अफेयर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. दोघांच्याही अफेयरमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात तणाव आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांच्या स्वभावामुळेही ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात अडचणी आल्याचं काही लोक सांगत आहे.