ऐश्वर्याचे डोळे पाहून संजय लीला भन्साळी पडले प्रेमात, पाहताच क्षणी दिली अभिनेत्रीला मोठी ऑफर
बॉलिवूडची विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज (१ नोव्हेंबर) ५१ वा वाढदिवस आहे. ऐश्वर्या अभिनयानंच नाही तर, आपल्या सौंदर्यानं आणि फॅशनमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. १९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्डच्या किताबावर आपले नाव कोरले. तिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
ऐश्वर्याच्या डोळ्यांची नेहमीच चर्चा होते. तिच्या डोळ्यांनी सर्वांनाच भुरळ पाडलीय. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जेव्हा पहिल्यांदा ऐश्वर्या रायला पाहिलं, त्यावेळी तिच्या डोळ्यांची भुरळ त्यांनाही पडली होती. त्यांच्या पहिल्या भेटीतच संजय भन्साळींनी ऐश्वर्याला थेट एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचीच ऑफर दिली.
अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून खुद्द संजय लीला भन्साळी यांनाही तिच्या डोळ्यांची भुरळ पडली होती. जेव्हा त्यांनी ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांनी लगेच तिला तिच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर दिली. अभिनेत्रीने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. मणिरत्नम दिग्दर्शित ‘इरुवर’ हा ऐश्वर्याचा पहिला टॉलिवूड चित्रपट होता. तर त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
२ वर्षांनंतर, ऐश्वर्या ‘ताल’ चित्रपटात दिसली, त्या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने केलेल्या अभिनयाची, तिने केलेल्या क्लासिकल डान्सचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. पण तरीही १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातूनच तिला प्रसिद्धी मिळाली. पण तिला ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट ऑडिशनमुळे नाही तर, तिच्या सौंदर्यामुळे तिला तो मिळाला. संजय लीला भन्साळी यांनी एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला माध्यमांसोबत संवाद साधला होता.
हे देखील वाचा – बिग बॉसच्या घरात एलिस कौशिकच्या वैयक्तिक जीवनावर सलमान खानने केले प्रश्न उपस्थित
मुलाखतीमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी सांगितले की, “ ‘राजा हिंदुस्तानी’च्या स्क्रिनिंगवेळी ऐश्वर्या माझ्यासोबत बोलत होती. तुम्ही दिग्दर्शित केलेला ‘खामोशी’ चित्रपट मला खूप आवडला, असं मला ऐश्वर्या म्हणाली. तेव्हा मला तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळेच सौंदर्य दिसले. तिच्या डोळ्यांवर मी खूपच प्रभावित झालो होतो. तुला चित्रपटामध्ये डायलॉग जरी नाही दिला तरी चालेल. तुझे डोळेच बोलके आहेत.” त्यावेळी भन्साळी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातल्या अभिनेत्रीच्या शोधात होते. ऐश्वर्याला पाहताच तिला त्यांनी चित्रपटामध्ये नंदिनीची भुमिका दिली. नंतर, या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५१ कोटींचा गल्ला जमावला होता.