गँगस्टर लाँरेन्स बिश्नोईची स्टोरी रुपेरी पडद्यावर दिसणार, सलमान खान मुख्य भूमिकेत ?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्यादिवशी बांद्रामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येचं वृत्त माध्यमांमध्ये आलं आणि अवघं राज्य हादरून गेले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नेते बाबा सिद्दीकी यांच्या आरोपींना पकडल्यानंतर संशयाचा धागा लॉरेन्स बिश्नोईकडे होता. त्यानंतर बिश्नोई गगँने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेतल्याची माहिती फेसबूकच्या माध्यमातून देण्यात आली होती.
हे देखील वाचा – ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चनचा घटस्फोट ? अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशीच सर्व कळलं
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देशातील काही नेत्यांची आणि सेलिब्रिटींच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमध्ये, बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते लॉरेन्स बिश्नोईबद्दल ट्वीट करताना दिसत आहे. नुकतंच त्यांनी एक्सवर पोस्ट करत गँगस्टर यांच्या बायोपिकबद्दल भाष्य केले आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “जर देशातील एखाद्या सर्वात मोठ्या गँगस्टरवर आधारित चित्रपट असेल, तर कोणताही चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शक दाऊद इब्राहिम किंवा छोटा राजनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला कास्ट करणार नाही. पण इथे मला लॉरेन्स बिश्नोईपेक्षा चांगला दिसणारा एकही सेलिब्रिटी दिसत नाही.”
राम गोपालच्या या ट्विटवर यूजर्सने कमेंट करत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या बायोपिकसाठी सलमान खानचे नाव सुचवले. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, सलमान खानला लॉरेन्सच्या भूमिकेत कास्ट करणे ही सर्वात मोठी विडंबना असेल. आणखी एका यूजरने लिहिले, राम गोपाल वर्मा दिग्दर्शक, बिश्नोई हिरो आणि सलमान विलन?
“सलमानने १९९८ मध्ये काळवीटची हत्या केली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई फक्त ५ वर्षांचा होता. २५ वर्ष बिश्नोईने हा राग मनात ठेवला. आणि आता ३० वर्षांचा असताना त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट सलमानला मारण्याचं असल्याचं तो सांगत आहे. प्राणीप्रेम एवढं वाढलं आहे की देव विचित्र जोक करत आहे?” असंही ट्वीट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलंय.
LAWRENCE BISHNOI was just a 5 YEAR OLD KID when the deer was killed in 1998 and Bishnoi maintained his grudge for 25 years and now at age 30 he says that his LIFE’S GOAL is to kill SALMAN to take REVENGE for KILLING that DEER .. Is this ANIMAL love at its PEAK or GOD playing a… https://t.co/KGiOSojxfT
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 14, 2024