फोटो सौजन्य: सोशल मीडिया
गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. अद्याप दोघांकडूनही त्यांच्या घटस्फोटांबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांवरूनच त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची चर्चा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापासून होत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना तेव्हापासून खरंतर सुरूवात झाली आहे.
हे देखील वाचा – मराठी चित्रपटांना मिळणार हक्काचं अनुदान, अभिनेता प्रसाद ओकच्या प्रयत्नांना यश!
आता पुन्हा चर्चा सुरू झाली ती बिग बींच्या वाढदिवसापासून. बिग बींचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. त्यांच्या वाढदिवशी असे काही किस्से घडलेय. तेव्हापासून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होते. नेटकऱ्यांनी, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दोघेही वेगळे झाल्याचेही जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बी यांचा यंदाचा ८२ वा वाढदिवस त्यांच्या फॅमिली मेंबर्सने ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर सेलिब्रेट केला. त्यांच्या बर्थडेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये कुठेही ऐश्वर्या दिसत नाहीये.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमिताभ बच्चन वाढदिवसाच्यावेळी ‘केबीसी’चं शूटिंग करत असतात. त्यांच्या वाढदिवशी कुटुंबीयांकडून एक खास व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. यावर्षी ही बच्चन फॅमिलीकडून अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या होत्या. पण यावर्षी आलेल्या शुभेच्छांच्या व्हिडिओत, ऐश्वर्या बच्चन दिसली नाही. गेल्या वर्षी ऐश्वर्या त्या व्हिडिओमध्ये दिसली होती. यावेळी जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता नंदा आणि त्यांची मुलं नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य यांच्याकडून बिग बींना खास व्हिडिओच्या माध्यमातून मेसेज आला होता.
त्या व्हिडिओमध्ये आराध्या बच्चनचे काही फोटोही होते, मात्र ऐश्वर्या राय कुठेही दिसली नाही. अशा परिस्थितीत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर व्हायरल होत आहेत. त्या व्हायरल पोस्टच्या कमेंटमध्ये नेटकऱ्यांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा झाल्या आहेत. कमेंटमध्ये एक युजर म्हणतो, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल पुष्टी मिळाली आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, “बिग बींच्या वाढदिवशी KBCच्या एपिसोडमध्ये सर्व काही सिद्ध झाले आहे. ॲशचे नावपण नाही किंवा साधा फोटोही नाही.”
ऐश्वर्या बच्चनने इंस्टाग्रामवर आराध्यासोबतचा बिग बींचा फोटोही शेअर केला होता. फोटो शेअर करत ऐश्वर्याने बिग बींच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या होत्या. त्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत, तुम्ही अभिषेक यांच्यासोबतच्या नात्यावर अधिकृत का नाही बोलत ?