Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भव्यदिव्य सेटवर उलगडणार रहस्य! वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज ‘घबाडकुंड’

भव्यदिव्य सेटवर साकारलेला ‘घबाडकुंड’ रहस्य, थरार आणि नात्यांची गुंतागुंत एकत्र आणणारा बिगबजेट मराठी सिनेमा नववर्षात प्रेक्षकांना भेटणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 14, 2025 | 05:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

 

जीवनात कितीही मेहनत घेतली तरी एकदा तरी अनपेक्षित ‘घबाड’ मिळावं, चुटकीसरशी नशीब पालटावं. अशी इच्छा प्रत्येकाची असते. अशाच रहस्यमय घबाडाच्या शोधाची गोष्ट मराठीतील आगामी बिगबजेट चित्रपट ‘घबाडकुंड’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘घबाड’ म्हणजे अचानक मिळालेली धनप्राप्ती आणि ‘कुंड’ म्हणजे पाणी साठलेली खोल जागा, या दोन्हींच्या मिलाफातून तयार झालेले हे शीर्षक जितके वेगळे, तितकीच त्याची कथा रहस्यमय आहे.

तब्बल २० वर्षांनी गायक अभिजीत सावंतने केली ‘ही’ गोष्ट, म्हणाला ‘आयुष्यातील मोठी संधी…’

‘अल्याड पल्याड’च्या यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, निर्माते रसिक कदम आणि सहनिर्माती स्मिता पायगुडे-अंजुटे यांनी रहस्य, अ‍ॅक्शन, विनोद आणि नात्यांची गुंतागुंत यांचा मिलाफ असलेला हा सिनेमा सादर केला आहे. पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे तब्बल 10-12 हजार स्क्वेअर फूट जागेवर पाण्याचे कुंड, खोल विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा आणि रहस्यमय मार्ग असलेला नेत्रदीपक सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर गूढ निर्माण करणारी दृश्ये चित्रीत केली जाणार आहेत.

या चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर यांसारखी बलाढ्य कलाकारमंडळी विविध व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. मराठीत प्रथमच अशा भव्य कॅनव्हासवर सादर होणाऱ्या या चित्रपटात रहस्य, थरारासोबतच मानवी नात्यांतील अविश्वास आणि संशयाची धारही अनुभवायला मिळणार आहे.

दिग्दर्शक प्रीतम पाटील म्हणाले, “मराठीतही प्रचंड, भव्य कॅनव्हास असू शकतो हे ‘घबाडकुंड’च्या निमित्ताने दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अप्रतिम सेट डिझाइन, संगीत, छायालेखन, संपादन आणि ग्राफिक्ससह प्रत्येक तांत्रिक बाबीत आम्ही कसूर ठेवलेली नाही.” निर्माते रसिक कदम आणि सहनिर्माती स्मिता पायगुडे-अंजुटे यांनी सांगितले की, ‘आयकॉन दी स्टाईल’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून ‘घबाडकुंड’ हा पहिला मनोरंजनपट असून, या वेगळ्या प्रयत्नाला प्रेक्षक नक्कीच दाद देतील.

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

व्हेलेंटिना इंडस्ट्रीज लि. च्या विशेष सहकार्याने बनलेला हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषांत प्रदर्शित होणार आहे. कथा लेखन संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांचे असून, कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी, संपादन सौमित्र धाराशिवकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता आकाश जाधव आहेत. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी अ‍ॅक्शन दृश्ये हाताळली आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणारा ‘घबाडकुंड’ हा केवळ रहस्यमय कथा नसून प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे.

Web Title: Ghabadkund is ready to meet the audience at the beginning of the year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Devdatta Nikam
  • kushal badrike

संबंधित बातम्या

कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल, म्हणाला; ”रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण…”
1

कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल, म्हणाला; ”रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण…”

“फोन करून माझी बायको मला म्हणते…”, प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट
2

“फोन करून माझी बायको मला म्हणते…”, प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.