(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
इंडियन आयडॉल पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत आता अजून एक खास सरप्राईज घेऊन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. अभिजीत अजून एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. हे फक्त गाणं नाही तर अभिजीत साठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तब्बल २० वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर गायकाने आणखी काही खास केले असल्याचे समोर आले आहे.
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’
अभिजीतने आजवर अजरामर गाण्यांमधून प्रेक्षकांना मोहित केले आणि एवढंच नाही तर बॅक टू बॅक ट्रेंडिंग गाणी करून आता हे नवं कोर गाणं तो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. अभिजीतने पहिल्यांदा मालिकेसाठी शीर्षक गीत गायलं असून हे गाणं त्याच्यासाठी देखील तेवढंच खास आहे. पहिलं ते नेहमीच खास असतं आणि हे गाणं अभिजीत साठी एवढं स्पेशल का आहे आहे यावर बद्दल सांगताना अभिजीत सांगितले की, ‘झी मराठी सारख्या वाहिनी साठी एखादं शीर्षक गीत करणं ही संधी खूप मोठी आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे.’
पुढे तो म्हणाला, ‘माझं पहिलं वाहिलं मालिकेसाठीच टायटल ट्रॅक मी त्यांच्यासाठी करतोय ही गोष्ट माझ्यासाठी खास आहे. या इंडस्ट्रीत २० वर्ष पूर्ण करताना ही संधी मिळाली याचा आनंद तर आहे पण हे गाणं येऊन अगदीच काही दिवस झाले आणि प्रेक्षकांनी त्याला दिलेलं प्रेम बघून खूप छान वाटतं. उत्तम गाणं शब्दबद्ध होणं आणि त्या गाण्याला योग्य न्याय देऊन ते गाणं ही जवाबदारी असताना प्रेक्षकांनी त्याला दिलेलं प्रेम बघता आपल्याकडून काहीतरी नक्कीच उत्तम झालं याचं समाधान आहे. वीण दोघांतली तुटेना साठी गायलेलं हे गाणं नक्कीच आठवणीत राहील यात शंका नाही.’ असे अभिजीत म्हणाला आहे.
अभिजीतचा एव्हरग्रीन आवाज आणि गाण्याचे सुमधुर बोल यांची उत्तम सांगड असलेली ‘वीण दोघांतली तुटेना’ मालिकेचं शीर्षक गीत सोशल मीडिया वर देखील व्हायरल होत आहे. आणि चाहते या गाण्याला चांगला प्रतिसाद देखील देत आहे. येणाऱ्या काळात अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मधून दिसणार असून फक्त मराठी नाही तर हिंदीत देखील तो उत्तम प्रोजेक्ट्स करणार असल्याचे समजले आहे.