'पहरेदारी बहुत हो गई, अब प्रहार होगा…' इमरान हाश्मी, सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरच्या 'ग्राउंड झिरो'चा खतरनाक ट्रेलर पाहिला का?
‘टायगर ३’, ‘सेल्फी’ आणि ‘ए वतन मेरे वतन’ सारख्या दमदार चित्रपटांच्या माध्यमांतून बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने इंडस्ट्रीत डेब्यू केले. ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखला जाणारा इमरान हाश्मी आता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ग्राऊंड झिरो’ असं या चित्रपटाचं नाव असून इमरान हाश्मीसोबत सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील त्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर आणि पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा ट्रेलर आला आहे.
सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपटामध्ये इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. सईसोबत चित्रपटात ललित प्रभाकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये, इमरान हाश्मी बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, ‘ग्राऊंड झिरो’ हा चित्रपट २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर आधारित आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. “एक चेहरा नसलेला शत्रू अन् एक निर्भय अधिकारी, शोधकार्य सुरु…” असं कॅप्शन देत ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेला आहे.
मुख्य बाब म्हणजे, प्रेक्षकांना चित्रपटात अनेक देशभक्तीपर संवाद ऐकायला मिळतील. शिवाय ट्रेलरमध्ये इमरान हाश्मीचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक अगदी भारावून गेले आहेत. मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर देखील एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नेमका तो कोणत्या आर्मी ऑफिसरची भूमिका साकारतोय, अद्याप हे तरी गुलदस्त्यात आहे. ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हायरल ट्रेलरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकारांनी ट्रेलर आपआपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.. ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.
Jeetendra Bday: कुटुंब आणि मित्रांसह जितेंद्र कपूरने साजरा केला वाढदिवस, सेलिब्रेशनचे Photo Viral
गेल्या ५० वर्षांतील ‘बीएसएफ’चं सर्वांत मोठं मिशन ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्या मिशनमध्ये मुख्य नेतृत्व बीएसएफ डेप्युटी कमांडर नरेंद्र नाथ दुबे यांनी केले होते. त्यांचीच मुख्य भूमिका बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी साकारणार आहे. पहिल्यांदाच इमरान लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच इमरानसह मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देओस्कर यांनी केले असून चित्रपटाच्या निर्मितीची धुरा कासिम जगमगिया, विशाल रामचंदानी, संदीप सी सिधवानी, अर्हाना बगाती, टॅलिसमॅन फिल्म्स, अभिषेक कुमार आणि निशिकांत रॉयने सांभाळली आहे. ‘ग्राउंड झिरो’ चित्रपट येत्या २५ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत इमरान आणि सई यांच्याव्यतिरिक्त झोया हुसैन, मुकेश तिवारी, दीपक परमेश, ललित प्रभाकर, रॉकी रैना आणि राहुल वोहरा यांसारखे अनेक कलाकार मंडळी आहेत.
ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, आयुष्मान खुरानाच्या पत्नीने शेअर केली पोस्ट!