'हेरा फेरी ३'मध्ये पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी अलीकडेच बहुप्रतिक्षित ‘हेरा फेरी ३’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांशिवाय चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आता परेश रावल यांची जागा कोण घेणार, याशिवाय ‘हेरा फेरी ३’मध्ये बाबू भैय्याच्या भूमिकेत कोण दिसणार? याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. अशातच बाबू भैय्याच्या भूमिकेसाठी परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठींचं नाव पुढे आलं. चाहत्यांनी निर्मात्यांना बाबू भैय्यासाठी पंकज त्रिपाठींचं नाव सुचवलं आहे.
महिषासुराच्या विनाशासाठी आई तुळजाभवानीचे ‘बालरूप’, सत्य आणि धर्माच्या विजयासाठी नवा अध्याय
चाहत्यांनी बाबू भैय्याच्या पात्रासाठी बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचं नाव निर्मात्यांना सुचवलं आहे. सध्या पंकज त्रिपाठी त्यांची अपकमिंग वेबसीरिज ‘क्रिमिनल जस्टीस ४’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान पंकज यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ‘हेरा फेरी ३’ बद्दल सांगितले की, “लोकांनी बाबूभैय्याच्या भूमिकेसाठी माझ्या नावाचा विचार केला आहे, हे मी सुद्धा ऐकलंय आणि वाचलंय सुद्धा. परंतु माझा विश्वास यावर नाही. परेश रावलजी खूप कमाल अभिनेते आहे. मी त्यांचा खूप मान ठेवतो. परंतु या भूमिकेसाठी मी योग्य व्यक्ती नाही, असं मला वाटतं.” अशाप्रकारे पंकज त्रिपाठींनी खुलासा केला.
याशिवाय ‘हेरा फेरी ३’मध्ये ते काम करणार नाहीत, याचाही खुलासा केलाय. पंकज त्रिपाठी हे एक अष्टपैलू अभिनेते असून, ते विशेषकरून त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी ‘फुकरे,’ ‘मिर्झापूर,’ ‘स्री,’ ‘बंटी और बबली २’ यांसारख्या चित्रपटांत विनोदी भूमिका साकारत, प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. त्यामुळेच आता परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’मधून एक्झिट घेतल्यानंतर चित्रपटाच्या चाहत्यांनी अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.