बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या हिना खानच्या धाडसाचे सलमानने केले कौतुक, म्हणाला, "आत्मविश्वास असलेली स्त्री..."
‘बिग बॉस ११’ ह्या शोची पहिली रनरअप टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान ठरली होती. कायमच आपल्या निस्सिम सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ह्या टीव्ही अभिनेत्रीनं पुन्हा एकदा बिग बॉस शोमध्ये उपस्थिती लावली आहे. ‘बिग बॉस १८’ च्या ‘वीकेंड का वार’ या भागात कर्करोगग्रस्त हिना खानने उपस्थिती लावली होती. हिनाला जून महिन्यात ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. तिला तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं आहे. अभिनेत्री देत असलेली झुंज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचं हटके मॅटर्निटी फोटोशूट, फोटो पोजेसने वेधलं लक्ष
हिनाच्या ह्या प्रेरणादायी प्रवासात अनेक सेलिब्रिटी आणि तिचे लाखो चाहते सहभागी झाले होते. नुकतेच तिने ‘बिग बॉस १८’ च्या ‘वीकेंड का वार’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी तिने सलमान खानचं मनापासून स्वागत केलं आहे. सलमान खाननही हिनाच्या धाडसाचे कौतुक केलं आहे. अभिनेत्रीने शोमध्ये उपस्थिती लावल्यानंतर, तिने घरातील सर्व सदस्यांची भेट घेतली. शिवाय त्यांच्यासोबत संवादही साधला. ‘बिग बॉस ११’ ह्या शोची पहिली रनरअप असलेल्या हिनाला शूटिंगनंतर सलमानने थांबवलं आणि तिच्या तब्येतीची चौकशी केली. इतकंच नाही तर तिला योग्य ते मार्गदर्शन केलं. याबद्दल तिने पोस्टच्या माध्यमातून सलमानचे आभार मानले.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये हिना खान म्हणते,
“नेहमी नम्र आणि दयाळू असलेल्या सलमान खानला कायम त्याला मी भेटते तेव्हा त्याच्याकडून कोणती ना कोणती गोष्ट मला शिकायला मिळते. अर्थात ही वेळ वेगळी होती. पूर्ण दिवस उभं राहून, शूटिंग पूर्ण करून तो इतका थकलेला असतानाही तो मला भेटला. त्याच्या कृतीने माझं हृदय जिंकलं. त्याने मला बोलावलं. तो माझ्याबरोबर बसला आणि जवळपास तासभर बोलला. त्याने माझ्या उपचाराविषयीचे प्रत्येक तपशील जाणून घेतले आणि माझा आत्मविश्वास अजून वाढावा म्हणून प्रयत्न केला. त्याने फक्त त्याचे अनुभव आणि ज्ञान माझ्यासोबत शेअर नाही केलं तर, तिथून मी निघताना “आणखी आत्मविश्वास असलेली स्त्री” आहे, याची खात्री करून घेतली. खरंतर त्याला हे काहीही करण्याची गरज नव्हती. पण त्याने ते केलं. तो कोण आहे… तो किती व्यस्त आहे… तो कितीही कामात व्यस्त असला तरीही त्याने मला वैयक्तिकरित्या मला खूप आधार दिला. हा माझ्यासाठी फक्त मनापासून आधार नाही तर एक धडाही आहे. आणि मी तो केव्हाच विसरणार नाही. तू जसा आहेस तसा रहा… मला दिलेल्या आधारासाठी थँक्यू सलमान.. तुझे मी कायमच आभारी असेन…” अशी पोस्ट तिने लिहिलीये.
कलर्स वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये हिना खान, भाईजान हिना खानचे स्वागत करताना दिसत आहे. हिना खानचे स्वागत करताना सलमान खान म्हणतो- कृपया रिअल लाइफ फायटर हिना खानचे स्वागत करा. यानंतर भाईजान हिना खानला मिठी मारतो, त्यानंतर हिना खान म्हणते- माझ्या या सुंदर प्रवासातून मी माझ्यासोबत घेतलेली गोष्ट म्हणजे ताकद. या शोमध्ये मला एक अतिशय सुंदर टॅग मिळाला आहे, संपूर्ण जग मला शेरखान म्हणून ओळखते. यानंतर सलमान खान म्हणतो की तू नेहमीच फायटर राहिली आहेस, आणि प्रत्येक आव्हानाचा सामना करत आहेस, यावेळी हिना, तू एक हजार टक्के पूर्णपणे बरी होशील. सलमान खानचे हे शब्द ऐकून हिना खान भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
फॅशन दुनियेत राज्य करते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता; सोशल मीडियावर फोटो चर्चेत!