Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅक्‍टरींपासून जंगलांपर्यंत: सोनी बीबीसी अर्थसह संपूर्ण विश्‍वाला एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याचा लुटा आनंद!

सोनी बीबीसी अर्थ नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांसाठी नवनवीन कार्यक्रम आणि सिरीज प्रदर्शित करताना दिसत असतात. अश्यातच सोनी बीबीसी अर्थ चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. सोनी बीबीसी अर्थसह संपूर्ण विश्‍वाला एक्‍स्‍प्‍लोअर करण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 07, 2024 | 10:37 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

शरदऋतूच्या आगमनाची चाहुल लागली आणि वातावरण उत्सवाचा रंग भरू लागले की सत्याधारित मनोरंजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या काही सर्वोत्कृष्ट वाहिन्यापैकी एक सोनी बीबीसी अर्थ आपल्या प्रेक्षकांना प्रेरणा आणि मनोरंजन पुरविण्यासाठी आकर्षक कार्यक्रमांची मालिका घेऊन येते. आपल्या नेहमीच्या आयुष्यातील वस्तूंच्या निर्मितीमागची जटिल प्रक्रिया उलगडून दाखविणाऱ्या ‘इनसाइड द फॅक्टरी’पासून ते सस्तन प्राण्यांच्या असामान्य जगाचे दर्शन घडविणाऱ्या ‘मॅमल्स’पर्यंत विविध विषयांवरचे हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनाला नवचेतना देतात.

आपल्या आठव्या पर्वासह पुनरागमन करणारा कार्यक्रम ‘इनसाइड द फॅक्टरी’ प्रेक्षकांना युरोपातील काही सर्वात मोठ्या फॅक्टरींच्या अद्भुत सफरीवर घेऊन जाणार आहे. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांना जीन्सपासून बाथ बॉम्ब्ज व जेलीबीन्सपर्यंत आपल्या दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूंच्या निर्मितीमागचे विज्ञान जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. ग्रेग वॉलेस आणि चेरी हीली यांच्या साथीने या वस्तूंच्या उत्पादनप्रक्रियेचा शोध घ्या आणि घरात सतत वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंचा इतिहास जाणून घ्या.

दरम्यान, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘मॅमल्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्राण्यांच्या विलक्षण जगाचा शोध घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. या सहा भागांच्या मालिकेमध्ये चिमुकल्या एट्रुस्कन श्रूपासून ते अगडबंब ब्लू व्हेलपर्यंत वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांमधील विविधता, निसर्गाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या क्षमता दाखविल्या जाणार आहेत. हे प्राणी अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये कसा तग धरतात आणि बदलत्या जगामध्ये सामना कशाप्रकारे करतात याचा शोध तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करता येईल. हे प्राणी आपल्या पृथ्वीग्रहावरील बदलत्या परिस्थितीतून मार्ग काढत असताना दिसून येणारी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची समाजशीलता व चिकाटी याचे साक्षीदार बनता येईल.

हे देखील वाचा- Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पेटली! रजत दलाल विरुद्ध ताजिंदर बग्गा

सोनी बीबीसी अर्थवर प्रदर्शित होणारे या कार्यक्रमांचे चित्तवेधक पहिले भाग न चुकवता नक्की पहा. इनसाइड द फॅक्टरीचा पहिला भाग ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १:०० वाजता प्रदर्शित होणार आहे, तर मॅमल्सचा पहिला भाग २१ ऑक्टोबर रोजी रात्री ९:०० वाजता प्रदर्शित होणार आहे. दोन्ही कार्यक्रम सोनी बीबीसी अर्थवर सोमवार ते शुक्रवार दाखविले जाणार आहे.

Web Title: From factories to jungles explore the universe with sony bbc earth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 10:37 AM

Topics:  

  • Hollywood

संबंधित बातम्या

khaby lame च्या 8000 कोटींच्या कराराला ब्रेक! ‘त्या’ एका चुकीमुळे जगातील नंबर 1 टिकटॉकर अडचणीत? मालमत्तेबाबत मोठा खुलासा
1

khaby lame च्या 8000 कोटींच्या कराराला ब्रेक! ‘त्या’ एका चुकीमुळे जगातील नंबर 1 टिकटॉकर अडचणीत? मालमत्तेबाबत मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.