
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हॉलिवूडचा मेगा-सुपरस्टार टॉम क्रूझ त्याच्या अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. तो हॉलिवूड चित्रपटसृष्टीचा एकप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने १९८० च्या दशकापासून ते आतापर्यंत त्याच्या अभिनयाने पडद्यावर आपली छाप सोडली आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी, मेगा-सुपरस्टार टॉम क्रूझला प्रतिष्ठित ऑस्कर मिळत आहे. त्याला या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत टॉमला मानद अकादमी पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो पाच दशकांपासून चित्रपट उद्योगात सक्रिय आहे. आणि अखेर आता अभिनेत्याचं एवढ्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आणि कामगिरी आहे. द मिशन: इम्पॉसिबल स्टारला यापूर्वी तीन वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे, परंतु आता, मानद ऑस्करसह, त्याची वर्षानुवर्षे चाललेली प्रतीक्षा संपली आहे. वयाच्या ४५ व्या वर्षी, मेगा-सुपरस्टार टॉम क्रूझला प्रतिष्ठित ऑस्कर मिळत आहे. यासाठी त्याच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
टॉम क्रूझची संपूर्ण कारकीर्द
टॉम क्रूझच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १९८१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेता म्हणून त्याचा पहिला हॉलिवूड चित्रपट “एंडलेस लव्ह” होता. परंतु, १९८३ मध्ये आलेल्या “रिस्की बिझनेस” या चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला वेग आला आणि त्याने सलग दोन हिट चित्रपट दिले. त्याने “मिशन इम्पॉसिबल”, “टॉप गन” आणि “जॅक रीचर” सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट
टॉम क्रूझची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द पाच दशकांपासून सुरू आहे आणि आता तो मानद ऑस्करचा मान मिळवत आहे. त्याने चित्रपटांमध्ये जीवघेणे स्टंट देखील केले आहेत. त्याच्या कामासाठी त्याला आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्याला तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, तीन स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि एक बाफ्टा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता आणखी नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Ans: Tom Cruise यांना Honorary Oscar (मानद ऑस्कर) मिळाला आहे.
Ans: अभिनेत्याच्या ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत टॉमला मानद अकादमी पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.