
एकाच वेळी हजारो थिएटर्समध्ये चित्रपट कसा होतो प्रदर्शित? (Photo Credit- X)
कोणताही चित्रपट नॅशनल किंवा वर्ल्ड वाईड शेअर करण्यासाठी एक अत्यंत सुरक्षित डिजिटल मुव्ही बॉक्स तयार केला जातो, ज्याला DCP (Digital Cinema Package) म्हणतात. यामध्ये चित्रपटाची ऑडिओ, व्हिडीओ, सबटायटल्स आणि इतर सर्व सूचना इंक्रिप्टेड स्वरूपात असतात.
वॉटरमार्कचा सुरक्षा कवच
या डीसीपीमधील प्रत्येक कॉपीवर एक विशिष्ट वॉटरमार्क असतो. जर चुकून चित्रपट लीक झाला, तर तो कोणत्या थिएटरमधून आणि कोणामुळे लीक झाला, हे सहज शोधता येते.
थिएटरमध्ये चित्रपट केवळ डाऊनलोड करून चालत नाही. त्यासाठी एक डिजिटल चावी लागते, ज्याला KDM (Key Delivery Message) म्हणतात. थिएटरचा स्टाफ डीसीपी पॅकेज डाऊनलोड करतो आणि लिनक्स (Linux) आधारित सर्व्हरद्वारे ती ‘डिजिटल की’ इन्स्टॉल करतो.
जोपर्यंत ही की इन्स्टॉल होत नाही, तोपर्यंत प्रोजेक्टरवर चित्रपट सुरू करता येत नाही.
जेव्हा सर्व सेटिंग पूर्ण होते, तेव्हा थिएटरचा सर्व्हर ऑडिओला स्पीकरकडे आणि व्हिडीओला प्रोजेक्टरकडे पाठवतो. विशेष म्हणजे, शो संपला की ही ‘केडीएम’ चावी चित्रपटाला आपोआप लॉक करते. पुढच्या शोच्या वेळेनुसार ती पुन्हा सक्रिय होते.
पूर्वी चित्रपटांच्या रिळ (Reels) किंवा डीसीपीचे फिजिकल बॉक्सेस कुरिअरने पाठवावे लागायचे. मात्र, आता हे सर्व काम सॅटेलाइट लिंक्स किंवा हाय-स्पीड सुरक्षित इंटरनेटद्वारे होते. यामुळेच चित्रपट एकाच वेळी जगभर सुरक्षितपणे आणि उत्तम गुणवत्तेत रिलीज करणे सोपे झाले आहे.
तुम्हाला असा ही प्रश्न पडला असेल की चित्रपट शुक्रवारला का रीलीज होतो शनिवार किंवा रविवारी का प्रदर्शित होत नाहीत? याचे उत्तर चित्रपटाच्या कमाईत आहे. जर एखादा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला तर त्याला पूर्ण तीन दिवसांचा वीकेंड मिळतो. हे तीन दिवस बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करतात. जर एखादा चित्रपट शनिवारी प्रदर्शित झाला तर त्याला फक्त दोन दिवस मिळतात – शनिवार आणि रविवार – आणि जर तो रविवारी प्रदर्शित झाला तर त्याला फक्त एकच दिवस मिळतो. रविवारनंतर, कामकाजाचे दिवस सोमवारी सुरू होतात, जेव्हा लोक थिएटरमध्ये कमी वेळा जातात. म्हणूनच, शुक्रवारी प्रदर्शित केल्याने चित्रपटाला अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि अधिक कमाई करण्याची संधी मिळते.