Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऋतिक रोशन OTT वर धुमाकूळ घालणार! प्राइम व्हिडिओसोबत ‘स्टॉर्म’ वेब सिरीजची घोषणा

ऋतिक रोशन ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत असून ऋतिक आणि प्राइम व्हिडिओने 'स्टॉर्म' या अ‍ॅक्शन-थ्रिलर वेब सिरीजसाठी हातमिळवणी केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 10, 2025 | 06:55 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित, गूढ, स्वप्नं आणि कठीण परिस्थितींमध्ये टिकून राहण्याची कथा सांगणारी थ्रिलर ड्रामा सीरिज ‘स्टॉर्म’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन प्रोजेक्टसाठी प्राईम व्हिडिओ आणि ऋतिक रोशनच्या HRX फिल्म्स (फिल्मक्राफ्ट प्रोडक्शन्सचा एक भाग) यांच्यात एक रोमांचक भागीदारी झाली आहे.

ऋतिक रोशन ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत असून, ‘स्टॉर्म’च्या निर्मितीची धुरा त्यांनी आणि ईशान रोशन यांनी सांभाळली आहे. ही ओरिजिनल सीरिज अजीतपाल सिंह यांनी तयार आणि दिग्दर्शित केली असून, कथा अजीतपाल सिंह, फ्रांस्वा लुनेल आणि स्वाति दास यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. ‘स्टॉर्म’ ही ऋतिक रोशनसाठी ओटीटीवर निर्माता म्हणून केलेली पहिलीवहिली प्रस्तुती आहे.

या सीरिजमध्ये पार्वती थिरुवोथु, आलया एफ, सृष्टि श्रीवास्तव, रमा शर्मा आणि सबा आझाद यांसारखे दमदार कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या थ्रिलर सीरिजचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून, तिची कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या, रोमांचक जगात घेऊन जाणार आहे.

प्राईम व्हिडिओचे APAC आणि MENA विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट गौरव गांधी म्हणाले, “आमचा नेहमीच असा प्रयत्न असतो की आम्ही कलाकार आणि क्रिएटिव्ह लोकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. ऋतिक रोशन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान आणि सर्जनशील कलाकार आहे. HRX फिल्म्ससोबतचा हा सहयोग आमच्यासाठी खास आहे. ‘स्टॉर्म’ केवळ एक सीरिज नसून, हे एक नवीन आणि प्रेरणादायी प्रवासाचे प्रारंभबिंदू आहे.”

सखीच्या स्वयंवरात उर्मिलाचा नवा डाव,लपंडाव मालिकेत येणार नवा ट्विस्ट

ते पुढे म्हणाले, “या सीरिजच्या निर्मितीदरम्यान आम्हाला खूप चांगला अनुभव मिळाला. ऋतिकची विशिष्ट दृष्टिकोन आणि ईशान रोशनचा जोश यामुळे ही कथा आणखीनच प्रभावी झाली आहे. ‘स्टॉर्म’मध्ये बळकट महिला पात्रं आणि एक अत्यंत गुंतवून ठेवणारी कथा आहे, जी जगभरातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

सासुरवाडीत बांधायचंय ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडला आपल्या स्वप्नातलं घर, किरणचं कोकणप्रेम पुन्हा चर्चेत

ऋतिक रोशन याने यावेळी सांगितले, “‘स्टॉर्म’ने मला ओटीटी विश्वात निर्माता म्हणून माझ्या प्रवासाची सुरुवात करण्याची संधी दिली. प्राईम व्हिडिओसोबत काम करणं ही माझ्यासाठी एक नैसर्गिक निवड होती, कारण ते दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओळखले जातात.”

तो पुढे म्हणाला, “‘स्टॉर्म’कडे मला जे आकर्षित करतं, ती म्हणजे अजीतपाल यांनी निर्माण केलेली सत्य आणि भावनांनी भरलेली गुंतवणारी कथा. यात असलेली पात्रं गडद, ठळक आणि लक्षात राहणारी आहेत, ज्यांना अत्यंत गुणी कलाकार साकारत आहेत. ही सीरिज केवळ भारतापुरती मर्यादित नसून, ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांशी नातं जोडू शकेल. मला अत्यंत आनंद होत आहे की लवकरच प्रेक्षक प्राईम व्हिडिओवर ही भन्नाट कथा पाहणार आहेत.”

Web Title: Hrithik roshan to make waves on ott web series storm announced with prime video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • hritik roshan
  • OTT platform
  • Web Series

संबंधित बातम्या

नोव्हेंबर महिन्यात ‘अल्ट्रा झकास मराठी’ OTT वर होणार धमाल, प्रेक्षकांना मिळणार हॉलीवूड आणि साऊथ मनोरंजनाचा तडका
1

नोव्हेंबर महिन्यात ‘अल्ट्रा झकास मराठी’ OTT वर होणार धमाल, प्रेक्षकांना मिळणार हॉलीवूड आणि साऊथ मनोरंजनाचा तडका

Weekend जाणार भारी! The Family Man 3 सह 7 जबरदस्त सिरीज-चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ; पाहा संपूर्ण यादी
2

Weekend जाणार भारी! The Family Man 3 सह 7 जबरदस्त सिरीज-चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ; पाहा संपूर्ण यादी

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क
3

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क

The Family Man 3: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित सिरीज कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, जाणून घ्या त्याची स्टोरी काय आहे?
4

The Family Man 3: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित सिरीज कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, जाणून घ्या त्याची स्टोरी काय आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.