Star Pravah Marathi Serial Update : स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवनवीन मालिकांची नांदी सुरु असून या मालिकांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. नशिबवान आणि लपंडाव या दोन्ही मालिकांनी आणि त्यातील कलाकारांनी कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या लपंडाव मालिकेत सखीच्या स्वयंवर करण्याचं सुरु आहे. याबाबतच अभिनेत्री श्रेया कुळकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे अभिनेत्री श्रेया कुळकर्णी ने आपल्या नवीन प्रोजेक्ट बाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तोच नवीन प्रोजेक्ट म्हणजे स्टार प्रवाह वरील नवीन मालिका ‘लपंडाव‘.लपंडाव मालिकेतले ’उर्मिला‘ हे पात्र तिच्या चाहत्यांना खूप आवडतंय . श्रेयाने या आधी अनेक हिंदी मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच स्वामी समर्थ, गाथा नवनाथांची, बाळूमामांच्या नावाने चांग भलं, शुभ विवाह अश्या अनेक मराठी मालिका देखील गजवल्या आहेत.लपंडाव मालिकेत आता सखी चे स्वयंवर आपल्याला दिसणार आहे.सखीच्या स्वयंवरात, श्रेयाने म्हणजेच उर्मिलाने आपल्या माहेरच्या मुलाला स्वयंवरात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सखीची प्रॉपर्टी आपल्याला मिळावी या मोहापायी उर्मिला कट कारस्थान करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिचा हा डाव तिच्यावरच उधळणार की यशस्वी होणार हे येत्या काहीी दिवसांतच समोर येईल.
भव्य सोहळा आणि मनोजन या स्वयंवरात तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्वयंवर अगदीच GenZ पद्धतीचं असणार आहे. आजकाल च्या GenZ जनरेशन ला आकर्षित करेल असे सीन्स या स्वयंवरात शूट झाले आहेत. श्रेया म्हणजेच लपंडाव मालिकेतली उर्मिला आता कसा तिचा डाव साधून माहेरचा मुलगा जिंकवणार आहे हे नक्कीच स्वयंवरात रीव्हील होणार आहे. लपंडाव मलिकेतली टीम सखी च्या स्वयंवरासाठी खूप उत्सुक आहे. मालिकेत अभिनेत्री श्रेया उर्फ उर्मिला ही सखी ची काकू आहे. कामत एम्पायर ची भावी सरकार तीला बनायचं असून त्या साठीच तिने स्वयंवरात तिचा डाव रचला आहे अशी श्रेयाने तिच्या पात्राविषयी माहिती दिली आहे.