
प्रसिद्ध फॅशन एन्फ्लूएंसरवर कोसळला दु:खाचा डोंगर
प्रसिद्ध फॅशन इनफ्लूएन्सर ईशा कालरा हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फॅशन इन्फ्लूएन्सरच्या पतीचे 19 ऑगस्टला निधन झाले आहे. ईशा कालराच्या पतीचं नाव अंकित कालरा आहे. ईशाने पतीच्या निधनाचे वृत्त इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिले आहे. ईशाच्या पतीच्या निधनाचे वृत्त ऐकून ईशाच्या कुटुंबीयांसह तिच्या सासरकडच्या मंडळींवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रसिद्ध फॅशन इन्फ्लुएन्सर इशा घई कालराचा पती अंकित कालरा यांचे वयाच्या 29 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण सायलेंट हार्ट अटॅक असल्याचे सांगितले जात आहे. वयाच्या 29 व्या वर्षी सायलेंट हृदयविकाराचा झटका अर्थात सायलंट हार्ट अटॅक आल्याची बातमी समोर आली असून सर्वांसाठीच हे धक्कादायक आहे.
कोण होता अंकित कालरा
अंकित कालरा एक इंटिरियर डिझायनर होता आणि त्यासोबत तो एक बिल्डर देखील होता. त्याचे मजेदार आणि विनोदी रील्स इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वी अंकितने ईशाशी लग्न केले. ईशाने पोस्ट शेअर करताना खास पतीसाठी भावुक संदेश लिहिला आहे. पतीचा फोटो पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन दिले की, “मला एक दिवस मागे घेऊन जा. मी गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याचे वचन देते. परत ये बाळा. मला तुझी खूप आठवण येत आहे.” ईशाने 20 ऑगस्ट रोजी पतीच्या निधनाची माहिती दिली होती.
हे देखील वाचा – The Family Man चे किती सीझन असणार? वेबसीरीजबद्दल महत्वाची अपडेट आली समोर
ईशा आणि अंकितचे फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न झाले होते. ते दोघेही कायमच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असायचे. ईशा कालरा पेशाने फॅशन एन्फ्लुएन्सर आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. मात्र या धक्क्यातून तिला सावरायला नक्कीच वेळ लागेल. याशिवाय सगळेच तिचे चाहते आणि अंकितचे चाहते हळहळत आहेत. नुकतेच अभिनेता मोहसीन खान यानेही आपल्याला हार्ट अटॅक येऊन गेल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सक्रिय आणि चांगले लाईफस्टाईल हाताळूनही अनेकदा जीवाची काहीच हमी राहिलेली नाही हे दिसून येत आहे. ईशाच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स केल्या असून तिच्या दुःखात सहभाग नोंदवलाय.