जयदीप अहलावत झाला मुंबईकर, मायानगरीत खरेदी केलं कोट्यवधींचं घर; किंमत वाचून डोळे फिरतील
‘राझी’, ‘पाताल लोक’, ‘अजीब दास्तान’, ‘थ्री ऑफ अस’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘जाने जान’, ‘महाराज’ अशा कलाकृतींमध्ये अनोख्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांसमोर येणारा अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत. कायमच आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याचे सध्या सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. अगदी सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला मुंबईमध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं वाटतं. असंच स्वप्न प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावत याचं देखील होतं. आता ते त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अभिनेत्याने मुंबईतील अंधेरी पश्चिममध्ये कोट्यवधींचं घर खरेदी केलं आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे करणार पर्यावरणाचा जागर
कायमच आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चर्चेत राहणाऱ्या जयदीप अहलावतच्या कष्टाचं चीज झालं आहे. जयदीपने मुंबईत घेतलेल्या हक्काच्या घराची किंमत अनेक कोटींच्या घरात आहे. ‘पाताल लोक’मधील हाथीराम चौधरी भूमिकेमुळे बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावतला कमालीची लोकप्रियता मिळाली. आज तो ओटीटीवरील सर्वात महागडा अभिनेत्यांपैकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता जयदीप अहलावत आणि त्याची पत्नी ज्योती हुड्डा यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात १० कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा करार मे २०२५ मध्ये अधिकृतपणे नोंदणीकृत झाला होता. हरियाणाचा रहिवासी असलेला जयदीप आता मुंबईकर झाला असून त्यासाठी त्याने कोट्यवधी रुपये मोजले आहेत.
पारंपारिक पद्धतीने पार पडणार इंद्रायणी अधोक्षजचा लग्नसोहळा, गोपाळ- इंदूच्या नात्यात अनपेक्षित वळणं
स्क्वायर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, अंधेरी पश्चिममधील पूर्णा अपार्टमेंटमध्ये जयदीपचा फ्लॅट आहे. त्याच्या फ्लॅटची किंमत १० कोटी रुपये इतकी असून अभिनेत्याने मे २०२५ मध्ये त्याच्या घराची अधिकृत डील केली आहे. अभिनेत्याच्या घराचा कार्पेट एरिया १,९५० चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया २१७.४७ चौरस मीटर आहे. त्यात ४ कार पार्किंग एरिया देखील आहे. घराच्या डीलसाठी अभिनेत्याने अतिरिक्त ६० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी शुल्क आणि ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फीही भरली आहे. जयदीपने ज्या भागात अपार्टमेंट खरेदी केले आहे त्या भागाची खास गोष्ट म्हणजे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, लिंक रोड आणि एसव्ही रोडसह अनेक मुख्य रस्त्यांनी जोडलेले आहे. येथे वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर मेट्रो लाईनची सुविधा देखील आहे.
जयदीप शेवटचा नेटफ्लिक्सवरील ‘ज्वेल थीफ’ चित्रपटामध्ये सैफ अली खानसोबत दिसला होता. जयदीपने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक दमदार प्रोजेक्ट्स केले आहेत. ‘रईस’, ‘राजी’, ‘पाताळ लोक’, ‘महाराज’, ‘जाने जान’, ‘संदीप और पिंकी फरार’, ‘अजीब दास्तान’, ‘थ्री ऑफ अस’, ‘ॲन ॲक्शन हिरो’, ‘कमांडो: ए वन मॅन आर्मी’, ‘कमांडो: ए वन मॅन आर्मी’, ‘अन्यर्स’ या चित्रपटांमध्ये तो त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या अभिनेता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे.