Panchayat Season 4 When And Where To Watch Know Release Date
ओटीटी विश्वामध्ये कायमच चर्चेत राहिलेल्या ‘पंचायत’ वेबसीरीजचे आजवर तीन सीझन चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘पंचायत’ वेबसीरीजचा चौथा सीझन येणार आहे. नुकतंच या वेबसीरीजची रिलीज डेट समोर आली आहे. प्रेम, मैत्री, राजकारण आणि वास्तववाद यांचा सुंदर संगम असलेली ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट आतुरतेने पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला आहे. नुकतंच मेकर्सकडून ‘पंचायत ४’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैझल मलिक, चंदन रॉय, जितेंद्र कुमार, सान्विका, दुर्गेश, सुनीता राजवार आणि पंकज झा स्टारर ‘पंचायत ४’ वेबसीरिज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी ॲपवर रिलीज होणार आहे. ‘पंचायत ४’ वेबसीरीजची निर्मिती टीव्हीएफने अर्थात ‘द व्हायरल फिलर’ने केली आहे आणि या सीरिजचे हक्क त्याच्याकडे आहेत. दीपक कुमार मिश्रा आणि अक्षय विजयवर्गीय हे त्याचे दिग्दर्शक आहेत. तर, चंदन कुमार लेखक आणि निर्माता आहेत. ‘पंचायत ३’च्या शेवटी प्रधानजींना गोळी लागली होती, त्यामुळे ते जखमी झाले होते. निवडणुकीच्या वातावरणात फुलेरामध्ये सर्वत्र तणाव होता. त्याच वेळी विकासच्या घरी आनंदाची बातमी येणार होती.
आता ‘पंचायत ४’मध्ये प्रेक्षकांना, प्रधानजींचे मुख्य मारेकरी कोण? रिंकू आणि सचिव जींची लव्हस्टोरी आणखीन पुढे तरी जाते का ? ते या सीझनमध्ये तरीही लग्न करणार का? पण त्याआधी प्रधानजी आणि मंजू देवी यांची त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया पाहणे मनोरंजक असेल. कारण त्यांना इतके दिवस त्यांच्या पाठीमागे काय चालले आहे याची काहीच कल्पना नाही. गावच्या सरपंचांच्या निवडणूकीमध्ये क्रांती देवी की मंजू देवी निवडून येणार ? या प्रश्नाचे उत्तर वेबसीरीज रिलीज झाल्यानंतरच मिळेल. त्याशिवाय गावाचा बराच झालेला कायापालटही आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘पंचायत ४’ची अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही. महिन्याभरापूर्वीच वेबसीरीजचा टीझर रिलीज झाला होता.
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचं नाणं खणखणीत, २५० व्या प्रयोगावर प्रिया बापटची स्पेशल पोस्ट
या टीझरमध्ये ‘पंचायत ४’ वेबसीरीजची रिलीज डेट २ जुलै २०२५ सांगण्यात आली आहे. या वेबसीरीजचा अद्याप ट्रेलर रिलीज झालेला नाही. वेबसीरीजच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिल्यामुळे चाहत्यांमध्ये ट्रेलरची उत्सुकता आहे. ‘पंचायत ४’ ही वेबसीरीज इतर सीझनप्रमाणे ८ एपिसोड्सचीच असणार आहे.