मागील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांत हाऊसफूल्ल सुरू आहे. या चित्रपटातून काश्मिरी पंडितांच्या वेदना लोकांसमोर आणणारे विवेक अग्निहोत्री सध्या प्रचंड चर्चेत आहे. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या धक्कादायक पलायनाची वेदनादायक कथा या चित्रपटाने ज्या प्रकारे चित्रित केली आहे ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट इतिहास रचत आहे. त्याची दररोज वाढणारी आकडेवारी सर्वांनाच आश्चर्यचकित करते.
दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’च्या यशानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. दहशतवादामुळे सर्व काश्मिरींना कसा त्रास सहन करावा लागला, ते कोणत्याही धर्माचे असोत, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
— J&K Police (@JmuKmrPolice) March 31, 2022
जम्मू-काश्मीर पोलिसांनी ३१ मार्च रोजी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १.६६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ५७ सेकंदाच्या या व्हिडिओला ‘द अनटोल्ड काश्मीर फाइल्स’ असे शीर्षक देण्यात आले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला काही क्षण भावूक करेल. या व्हिडिओ क्लिपमध्ये दहशतवादाच्या कालखंडाचे चित्रण करणारी अनेक दृश्ये आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर फैज अहमद फैज यांची ‘हम देखेंगे’ ही कविता ऐकू येते. ‘द काश्मीर फाईल्स’मध्येही हाच यमक वापरण्यात आला आहे.
त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘दहशतवादी एसपीओ इश्फाक अहमद यांच्या घरात घुसले आणि त्यांचा भाऊ उमर जानसह त्यांची हत्या केली. शांततेचे समर्थन करणारे असे अनेक काश्मिरी मारले गेले. काश्मीरमध्ये लक्ष्य करून २० हजार लोक मारले गेले. आवाज उठवण्याची वेळ आली आहे. या व्हिडिओच्या शेवटी लिहिले आहे की, ‘आम्ही काश्मीर आहोत, आम्ही पाहू’.