६० कोटींचा बंगला अन् बॉलिवूडमधली यशस्वी कारकिर्द; 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची संपत्ती वाचून व्हाल अवाक...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याला विशेष ओळखीची कोणतीही गरज नाही. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा अभिनेता सध्या सोशल मीडियावर त्याच्या नेटवर्थमुळे चर्चेत आला आहे. सेलिब्रिटी म्हटलं की, चाहत्यांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायची फार उत्सुकता असते. त्याच्या लाईफस्टाईलबद्दल आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. अनेकदा सेलिब्रिटीमंडळी आपल्या लाईफबद्दल एकूण एक माहिती चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण, जॉन अब्राहम मात्र तसा नाही. त्याने आपलं करियर आणि खासगी आयुष्य संपूर्ण वेगळं ठेवलं आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन
सध्या ‘द डिप्लोमॅट’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला जॉन अब्राहम सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये त्याच्या नेटवर्थची जोरदार चर्चा होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून चर्चेत राहणारा जॉन एक प्रसिद्ध इन्वेस्टर, बिझनेसमन आणि फिटनेस आयकॉन म्हणून सुद्धा तो चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जॉनने अभिनयाच्या जोरावर नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवून त्याने एक स्वत:चं मजबूत आर्थिक साम्राज्य निर्माण केले आहे. आज अभिनेत्याकडे तब्बल २५१ कोटींची संपत्ती आहे. चला एक नजर टाकूया, अभिनेत्याच्या संपत्तीवर…
जॉन अब्राहमचे मुंबईतल्या बांद्रासारख्या पॉश भागात खूप मोठं घर आहे. शिवाय, अभिनेत्याने स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस चालवण्याबरोबरच विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे. अभिनेत्याचे बांद्रा वेस्टसारख्या परिसरामध्ये, सी फेसिंग डुप्लेक्स पेंटहाऊस आहे. अभिनेत्याचं घर त्याचा भाऊ एलन अब्राहम याने डिझाईन केले आहे. जॉनचं घर एका निवासी संकुलाच्या ७ व्या आणि ८ व्या मजल्यावर असून त्याच्या घराचं नाव, “व्हिला इन द स्काय” असं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरल डिझाईनने जॉन अब्राहमच्या घराला ‘बेस्ट होम’चा किताब दिलेला आहे. इतर काही संस्थांकडूनही अभिनेत्याच्या घराला पुरस्कार मिळाला.
“मी वाटच बघत होतो, मला…” मराठी- हिंदी भाषेच्या वादावर अजय देवगणची प्रतिक्रिया; म्हणाला, “आता माझी…”
जॉन अब्राहमचे घर खूप सुंदर आणि खास आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, जमिनीपासून छतापर्यंत असलेल्या काचेच्या भिंती अभिनेत्याच्या घराचे विशेष आकर्षण आहे. अभिनेत्याच्या घरातून थेट अरबी समुद्राचेही दृश्य दिसते. त्याच्या घरात असणाऱ्या लाकडी डेकवर उभं राहिल्यास असं वाटतं की, तुम्ही एखाद्या समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टमध्ये आहात. जॉनने त्याच्या ६० कोटी रुपयांच्या पेंटहाऊसला ‘बेसिक’म्हटले. जॉनने त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर त्याची खासगी जिम बांधली आहे. फिटनेस फ्रिक म्हणून ओळख असलेल्या जॉनच्या जिममध्ये सर्व आधुनिक मशीन्स आहेत. याशिवाय, घरात एक टेरेस गार्डन देखील आहे, अभिनेत्याने त्याच्या डुप्लेक्स अपार्टमेंटचे दोन्ही मजले लाकडी जिन्याने जोडले आहेत.
जॉन अब्राहमच्या घरातील लिव्हिंग रूम एरियामध्ये आलिशान सोफा आणि लाकडी फर्निचर आहे. जॉनच्या घरातील ओपन टेरेस भरपूर झाडांनी सजवलेले असून एका गार्डन प्रमाणेच त्याच्या घराचं टेरेस आहे. येथून अरबी समुद्राचे विहंगम असे सुंदर दृश्य आणि माउंट मेरी हिल येथील सुंदर दृश्ये सुद्धा दिसतात. या अपार्टमेंटव्यतिरिक्त जॉनकडे ७०.८३ कोटी रुपयांचा आणखी एक बंगलादेखील आहे. जॉनचा हा दुसरा अलिशान बंगला मुंबईतील खार परिसरातील लिंकिंग रोडवर आहे. अभिनेत्याने केवळ ५,४१६ चौरस फुटांचा बंगलाच खरेदी केला नसून बंगला असलेल्या जागेवरील ७,७२२ चौरस फूट जमीनदेखील खरेदी केली आहे.
प्राजक्ता कोळीने रचला इतिहास! बनली TIME100 Creators मधील पहिली भारतीय डिजिटल क्रिएटर
जून २०२५ मध्ये जॉनने मुंबईतल्या बँडस्टँडमधील प्रमुख निवासी क्षेत्र असलेल्या सी ग्लिम्प्स कॉ- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (Sea Glimpse Co-operative Housing Society)मध्ये तीन आलिशान अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. ज्याचे मासिक भाडे ६.३० लाख रुपये असून वार्षिक भाडे ४.३ कोटी इतके आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता पाच वर्षांच्या भाडेपट्ट्याच्या कालावधीत दाखल झाला आणि भाड्यात वार्षिक आठ टक्के वाढ झाल्याने, अभिनेता मुंबईतील त्याच्या तीन मालमत्ता भाड्याने देऊन ४.३ कोटी रुपये कमवेल. जॉनची फक्त मुंबईतच मालमत्ता नाही, तर त्याच्याकडे लॉस एंजेलिस आणि सेंट्रल लंडन, यूके येथेही रिअल इस्टेट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, लॉस एंजेलिसच्या बेल एअर परिसरामध्ये अभिनेत्याचे एक भव्यदिव्य आणि लक्झरियस अपार्टमेंट आहे. जिथे जेनिफर अॅनिस्टन, अँजेलिना जोली यांसारखे हॉलीवूड स्टार राहतात. अभिनेत्याकडे सेंट्रल लंडनच्या एका पॉश परिसरात आणखी एक मालमत्ता सुद्धा आहे, जी तो त्याच्या प्रॉडक्शन हाऊससाठी परदेशी मुख्यालय म्हणून वापरतो. जॉनची जे. ए. एंटरटेन्मेंट नावाच्या प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. या कंपनीने अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांना चित्रपटातून लाँच केले. जॉन प्रामुख्याने स्वतःच्या चित्रपटाची स्वत:च निर्मिती करतो. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसने ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’, ‘अटॅक’, ‘बाटला हाऊस’, ‘वेदा’, अलीकडे रिलीज झालेला ‘द डिप्लोमॅट’यांसारख्या चित्रपटांना पाठिंबा दिला.
श्री महावतार बाबाजींची महती सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटही जाहीर…
जॉन Indian Super League (ISL) मध्ये भाग घेणाऱ्या NorthEast United FC फुटबॉल क्लबचा सह-मालक (Co- Owner)आहे. या फुटबॉल क्लबची सह-मालकी जया बच्चन यांच्याकडे असून फुटबॉल क्लबची मालकिन जॉनची पत्नी प्रिया रुंचाल आहेत. हा क्लब भारतातील आठ ईशान्य राज्यांचे प्रतिनिधित्व करतो. जॉन अब्राहमने NOTO या हेल्दी आईस्क्रीम ब्रँडमध्ये गुंतवणूक केलेली आहे. ही आईसक्रिम कमी कॅलरीज् असलेली आईस्क्रीम म्हणून ओळखली जाते. २०२४ मध्ये , त्याने Subko CoffeeRoasters मध्ये देखील गुंतवणूक केली होती. हा ब्रँड भारतात त्याच्या प्रीमियम कॉफी आणि कोकोसाठी प्रसिद्ध आहे.
जॉनला अभिनय आणि जिमिंगव्यतिरिक्त बाईक आणि रेसिंगचीही मोठ्या प्रमाणावर आवड आहे. त्याने कायमच स्वत:ची आवड जोपासली आहे. अभिनेत्याने अलीकडेच, जे. ए. रेसिंग गोवा एसेस ही रेसिंग टीम विकत घेतली. या टीमने २०२४ मध्ये इंडियन रेसिंग फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. जॉनकडे अनेक लक्झरियस कार आणि सुपरबाईक्सचे कलेक्शन आहे. ज्यामध्ये, Lamborghini Gallardo, Nissan GT-R Black Edition, Porsche Cayenne Turbo, Audi Q7 And Q3, BMW S1000 RR या लक्झरियस कार्सचा समावेश आहे. जॉनने त्याची आवड असलेल्या फिटनेसचे बिझनेसमध्ये रूपांतर केले. जॉन जेए फिटनेस नावाच्या जिमचा मालक आहे. अभिनेत्याच्या जिमचा ब्रँड परवडणाऱ्या; पण उच्च दर्जाच्या फिटनेस सुविधा प्रदान करतो.